team india twitter
Sports

Team India News: टीम इंडियात संधी मिळेना! शिखर धवननंतर हे ३ भारतीय खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

Shikhar Dhawan Retirement: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवनने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आणखी ३ खेळाडू आहेत जे निवृत्ती घेऊ शकतात.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवनने भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र त्याला कमबॅक करता आला नाही. गेल्या काही वर्षांपासून रोहितचा पार्टनर म्हणून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना संधी दिली जात आहे.

त्यामुळे शिखर धवनचे कमबॅक करण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान शिखर धवनसह आणखी काही भारतीय क्रिकेटपटू देखील आहेत. जे लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतात.

अंजिक्य रहाणे

अजिंक्य रहाणे हा कसोटी संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र आता तो संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतोय. २०२३ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यानंतर तो संघात कमबॅक करु शकलेला नाही. रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. यासह दुलीप ट्रॉफीसाठीही त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याचे भारतीय संघात कमबॅक करण्याचे मार्ग जवळजवळ बंद झाले आहेत.

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाची भिंत म्हटंलं जातं. पुजाराला भारतीय संघातील सर्वात विश्वासू खेळाडू म्हटलं जायचं. मात्र आता त्याला संघात स्थान मिळणंही कठीण झालं आहे. राहुल द्रविडनंतर पुजाराने भारतीय कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे.

मात्र जून २०२३ नंतर त्याला भारतीय संघात मिळू शकलेलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फानयलचा सामना हा त्याचा शेवटचा सामना होता.

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक होता. मात्र त्याला आता एका फॉरमॅटसाठी संघात स्थान मिळवणंही कठीण झालं आहे. कसोटी क्रिकेटमध्येही भुवनेश्वर कुमार प्रमुख गोलंदाज होता.

मात्र २०२२ नंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. २१ जानेवारी २०२२ ला तो आपला शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यांतर तो भारतीय संघाच्या जर्सीत दिसून आलेला नाही. आता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंगसारखे गोलंदाज असताना भुवनेश्वर कुमारला संधी मिळणं जरा कठीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT