CRICKET australia saam tv news
Sports

IPL 2024 Auctions: IPL लिलावात या २ खेळाडूंवर लागणार सर्वात मोठी बोली! दिग्गज भारतीय खेळाडूची मोठी भविष्यवाणी

R Ashwin Prediction: भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनने दोन अशा खेळाडूंची नावं सांगितली आहेत, जे या लिलावात महागडे ठरु शकतात.

Ankush Dhavre

R Ashwin Prediction On IPL 2024 Auction:

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा लिलाव सोहळा १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. या लिलावात ३३३ खेळाडूंनी समावेश घेतला आहे.

ज्यात २१४ भारतीय आणि ११९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागणार , याबाबत दिग्गज क्रिकेटपटूंनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली आहे.दरम्यान भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विनने दोन अशा खेळाडूंची नावं सांगितली आहेत, जे या लिलावात महागडे ठरु शकतात. (R ashwin Prediction News)

आर अश्विनने केली भविष्यवाणी..

आर अश्विनच्या मते भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागू शकते. त्याच्या मते १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे महागडे खेळाडू ठरु शकतात.

मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सवर १४ कोटींहून अधिकची बोली लागेल असा अंदाज आर अश्विनने व्यक्त केला आहे. आर अश्विनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ही भविष्यवाणी केली आहे. (Latest sports updates)

या भारतीय खेळाडूंवर लागेल सर्वाधिक बोली..

आर अश्विनच्या मते भारतीय फलंदाज शाहरुख खानवरही १० कोटींपेक्षा अधिकची बोली लागू शकते. तर वर्ल्डकप २०२३ स्पर्धा गाजवणारा न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रविंद्रवरही या हंगामात मोठी बोली लागू शकते. आर अश्विनच्या मते रचिन रविंद्रवर ४ ते ७ कोटींची बोली लागू शकते.

या भारतीय गोलंदाजावर लागणार मोठी बोली..

आर अश्विनने आणखी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते, हर्षल पटेलवर ७ ते १० कोटींची बोली लावली जाऊ शकते. तर वेस्टइंडीजचा धाकड खेळाडू रोमेन पॉवेलवर ४ ते ७ आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्जीवर ७ ते १० कोटींची बोली लागू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT