IND vs WI 1st Test: आर अश्विन हा भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. भारतात आणि परदेशात जाऊन त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र तरीदेखील त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. या निर्णयानंतर टीम मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. आता १ महिन्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघासाठी कमबॅक करताना आर अश्विनने पहिल्याच डावात ५ गडी बाद केले आहेत. दरम्यान या कामगिरीनंतर त्याने खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.
वेस्टइंडीज विरुद्धच्या कामगिरीनंतर बोलताना आर अश्विन म्हणाला की, 'जेव्हा तुमच्या कारकिर्दीतील वाईट काळ सुरु असतात त्यावेळी तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एक पर्याय म्हणजे निराश होऊन तक्रार करा आणि दुसरा पर्याय म्हणजे चुकांमधून शिका. मी असा व्यक्ती आहे जो सतत चुकांमधून शिकत असतो. खरं तर या चांगल्या दिवसानंतर घडणारी चांगली गोष्ट म्हणजे मी माझ्या कुटुंबासोबत जेवण करणार, चर्चा करेल आणि नंतर झोपी जाईल.' (Latest sports updates)
तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून वगळण्याबाबत बोलताना आर अश्विन म्हणाला की, 'एक क्रिकेटपटू म्हणून बाहेर बसणं खूप कठीण आहे. जेव्हा मला कळालं की, मला संघात स्थान मिळालं नाही त्यावेळी मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन राग काढू शकलो असतो.
पण मग माझ्यात आणि एखाद्या युवा खेळाडूमध्ये काय फरक राहिला असता. मी मैदानात खेळायला उतरण्यासाठी मानसिक दृष्ट्या तयार होतो. पण मला खेळायला मिळणार नाही यासाठी देखील माझी तयारी होती. शेवटी संघ जिंकणं हे महत्वाचं आहे. मात्र मला संधी मिळाली असती तर मी नक्कीच चांगली कामगिरी केली असती.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.