Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Sara Ali Khan Temple Ban: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेज, व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता अभिनेत्री सारा अली खानला चारधाम यात्रेसाठी बंदी घालण्यात आलीय असा दावा केलाय. मुस्लीम असल्याने बंदी घातल्याचा दावा केलाय.पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.
Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?
Published On
Summary
  • सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती.

  • सारा अली खान ही मुस्लिम असल्यामुळे तिला मंदिरात प्रवेश नाकारला, असा दावा करण्यात आला आहे.

  • मंदिरात दर्शनासाठी विशिष्ट धार्मिक अट नाही, परंतु परंपरा आणि नियमांचे पालन अपेक्षित असते.

बॉलिवडू स्टार, अभिनेत्री सारा खान. आता साराला केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आलेयत. सारा खान ही गैर हिंदू असल्याने तिला प्रवेश बंदी करण्यात आलीय. तसं फर्मानच मंदिर प्रशासनाने काढल्याचा दावा करण्यात आलाय. सारा अली खान ही मुस्लीम धर्माची असून, अनेक हिंदू मंदिरात दर्शनासाठी जात असते. मात्र, आता तिला केदारनाथ मंदिरात प्रवेश बंदी केल्याने ती दर्शनासाठी जाऊ शकणार नाहीये. व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?
Gashmeer Mahajani: गळ्यात कवड्याची माळ अन् कपाळाला मळवट; गश्मीर महाजनीचा नव्या अवतारातला थरारक 'गोंधळ'

व्हायरल मेसेज

सारा अली खानला केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केलेयत.तिला हिंदू धर्मावर असलेल्या निष्ठेचा लेखी पुरावा द्यावा लागेल. हा मेसेज व्हायरल होत असून, अनेकांनी यावरून सोशल मीडियावर टीकाही केली. तर या निर्णयावरून काँग्रेसने निशाणा साधलाय. तर या निर्णयाचं अभिनेत्री कंगना रणौतनेही समर्थन केलंय.

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?
Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

कंगनाने समर्थन केलंय पण, खरंच मंदिर प्रशासनाने केदारनाथ दर्शनासाठी बंदी घातलीय का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली. याबाबत आमच्या टीमने थेट मंदिर प्रशासनाकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

साम इन्व्हिस्टिगेशन

फक्त सारा खानलाच केदरनाथ प्रवेश बंदी घातलेली नाही

सनातन धर्माचे पालन न करणाऱ्यांना प्रवेशावर बंदी

गैर-हिंदू भाविकांना प्रतिज्ञापत्र बंधनकारक

मंदिर प्रशासनाने प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला

तीर्थक्षेत्रांवरील व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश

सारा अली खानने गेल्या वर्षीच चारधाम यात्रा केली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यात्रेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.त्यामुळे तिच्याबद्दल प्रश्न विचारला असता, सनातनी असण्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी अट घातलीय. त्यामुळे साराला केदारनाथचे दरवाजे बंद असल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com