Sara Ali Khan Must Submit Affidavit To Visit Kedarnath
Sara Ali KhanSAAM TV

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

Sara Ali Khan Must Submit Affidavit To Visit Kedarnath : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला आता प्रतिज्ञापत्रासह केदारनाथमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Published on
Summary

सारा अली खान कायम केदारनाथ, बद्रीनाथची यात्रा करताना दिसते.

साराला यापुढे केदारनाथला जायचे असल्यास प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

'केदारनाथ' चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायम तिच्या केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर याचे सुंदर फोटो शेअर करत असते. अशात आता सारा अली खानला जर बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घ्यायचे असतील, तर एक प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मंदिर समितीने लागू केला नियम

मंगळवारी, बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "आतापासून जर कोणत्याही अहिंदू व्यक्तीला या मंदिरांमध्ये पूजा-अर्चा करायची असेल, तर त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य असेल. अहिंदू भाविकांना आपण हिंदू धर्मावर श्रद्धा बाळगतो, याचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.जर सारा अली खानने सनातन धर्माप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आणि तसे प्रतिज्ञापत्र सादर केले, तर आम्ही तिला मंदिरात पूजा करण्याची परवानगी देऊ." TOI च्या रिपोर्टनुसार, अशी माहिती 'IANS' च्या वृत्तात देण्यात आली आहे.

सारा अली खान गेल्या अनेक वर्षांपासून केदारनाथ यात्रा करत आहे. तिने आपले आध्यात्मिक नाते सातत्याने जपले आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या पवित्र तीर्थस्थळाला ती वारंवार भेट देत असते. साराने 2018 ला 'केदारनाथ' हा चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून ती सातत्याने केदारनाथला येते. विशेषतः एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जेव्हा भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले होतात, तेव्हा सारा दर्शनाला जाते.

सारा अली खान मस्त ट्रेकिंगचा आनंद घेत या मंदिरांपर्यंत पोहचते. या प्रवासादरम्यान, ती कोणत्याही विशेष सवलती किंवा विशेषाधिकार न घेता, पहाटेचे दर्शन आणि पूजा-अर्चा यांसारख्या नियमित धार्मिक विधींमध्ये सहभागी होते. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये केदारनाथच्या बर्फाच्छादित परिसराचे, पूजेचे आणि सुंदर निसर्गाचे दर्शन घडते. चाहते आता सारा अली खान आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Sara Ali Khan Must Submit Affidavit To Visit Kedarnath
Nora Fatehi Song Controversy : "हे गाणे मी लिहिले नाही..."; नोरा फतेहीच्या वादग्रस्त गाण्यावर गीतकारने केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com