मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नुकतीच केदारनाथ यात्रेवरून घरी परतली आहे. तिच्या सोबत या यात्रेत प्राजक्ता माळी देखील सहभागी होती. यांनी आपल्या कुटुंबासोबत केदारनाथ (Kedarnath Trip ) आणि बद्रीनाथचे दर्शन घेतले आहे. त्यांच्या या ट्रिपचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ अमृता खानविलकरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र नुकताच अमृताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केदारनाथ यात्रेवरून आल्यावर अमृता खानविलकरची तब्येत बिघडली आहे. तिनेही माहिती देणार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरीवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. घरी आराम करत हाताला सलाईन लावून तिने व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने आपला केदारनाथचा अनुभव आणि प्रकृतीते अपडेट दिले आहेत. तसेच केदारनाथला जाताना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले आहे.
अमृता खानविलकरने व्हिडीओतून दिलेल्या माहितीनुसार, अमृता केदारनाथवरून घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी आजरी पडली आहे. तिला सलाईन लावावे लागले आहे. ती गेल्या २-३ दिवसांपासून आजारी होती. अमृताला ट्रेक करून खाली येताना प्रचंड त्रास झाला. तिला माऊंटेन सिकनेस अजूनही आहे. ट्रेकदरम्यान पाऊस पडला नाही, त्यामुळे दगदग झाली नाही. यात्रा सुंदर झाली पण ती तेवढीच आव्हानात्मक असल्याचे अमृताने सांगितले.
केदारनाथ जाणाऱ्यासाठी अमृताने सांगितले की, केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 11 फूट उंचीवर आहे. त्यामुळे तुमच्या शरीराची विशेष काळजी घ्या. गोळ्या सोबत ठेवा. ORSचे पाणी प्या. तेथील वातावरणाशी आधी जुळवून घ्या. ट्रेक करताना कोणतीही दगदग करू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.