Gashmeer Mahajani: गळ्यात कवड्याची माळ अन् कपाळाला मळवट; गश्मीर महाजनीचा नव्या अवतारातला थरारक 'गोंधळ'

Gashmeer Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटातील ‘गोंधळ’ गीतामध्ये अभिनेता गश्मीर महाजनी दमदार अवतारात पहायला मिळणार आहे.
Gashmeer Mahajani
Gashmeer MahajaniSaam Tv
Published On

Gashmeer Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सालबर्डी’ या आगामी चित्रपटातील ‘गोंधळ’ गीतामुळे अभिनेता गश्मीर महाजनी पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला आहे. येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात गश्मीर एका पारंपरिक गोंधळीच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोंधळी ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा मानली जाते. गावोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणाऱ्या या कलाकारांची भक्ती आणि ऊर्जा मनाला स्पर्श करणारी असते. याच पार्श्वभूमीवर ‘सालबर्डी’ चित्रपटात सादर करण्यात आलेले गोंधळ गीत प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देत आहे. “काळरातीचा जोर वाढला घोर...” या ओळींनी सजलेल्या या गीतात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोली आणि ऊर्जादायी नृत्याचा संगम साकारला आहे.

Gashmeer Mahajani
Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रेक्षकांकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. संबळाच्या ठेक्यावर सादर होणाऱ्या या गोंधळामुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिक गडद होत असल्याचे दिसते. गाण्याचे गीतकार मुकुंद भालेराव असून संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी त्याला आकर्षक संगीत दिले आहे. गायक अजय गोगावले यांच्या दमदार आवाजामुळे गाण्याची प्रभावीता अधिक वाढली आहे, तर नृत्यदिग्दर्शन आशिष पाटीलने केले आहे.

Gashmeer Mahajani
Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला की, “गोंधळ ही केवळ परंपरा नसून देवीभक्तीची ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे. ‘सालबर्डी’मधील माझी भूमिका कथानकाला वेगळी दिशा देणारी आहे. या गाण्याचे शूटिंग करताना अंगावर रोमांच उभे राहत होते, आणि तो अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे.”

सालबर्डी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील दुर्गम भागात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित आहे. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून दिग्दर्शन रमेश साहेबराव चौधरी यांनी केले आहे. पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे यांसह अनेक कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com