Pat Cummins Statement: संपूर्ण क्रिकेटविश्वाला हादरवून सोडणारा निर्णय कमिन्सने का घेतला? वाचा कारण

Pat Cummins News: नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला?
ind vs aus
ind vs austwitter
Published On

World Cup 2023 Final:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर कब्जा केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय खेळाडूंना मागे सोडलं.

हेच कारण होतं की, भारतीय संघ या सामन्यात कमबॅक करुच शकला नाही. हा सामना सुरु होण्यापूर्वीच पॅट कमिन्सच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत मोठा खुलासा केला आहे.

या सामन्यापूर्वी असा अंदाज वर्तवला गेला होता की, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हे नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मानेही मान्य केलं होतं. मात्र कमिन्सने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाबाबत बोलताना तो म्हणाला की, 'वर्ल्डकपच्या सामन्यात तुम्ही गोलंदाजीत चुका करु शकता. या गोष्टींचा तितका फरक पडत नाही. मात्र तुम्ही फलंदाजीत चुका करु शकत नाही. जर तुम्ही फलंदाजीत चुका केल्या तर तुम्ही दबावात येऊ शकता आणइ हे संघासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे मला वाटलं की, नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याची ही योग्य वेळ आहे.' हे प्रमुख कारण होतं की, पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Latest sports updates)

ind vs aus
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी

भारतीय संघाचा पराभव..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.

भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने ४७ धावांची आक्रमक सुरुवात करुन दिली. तर केएल राहुलने ६६ धावांची आक्रमक खेळी केली. तर विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.

ind vs aus
Ind vs Aus, World Cup 2023: टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न २ चुकांमुळे भंगलं; अन्यथा निकाल काही वेगळाच असता

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com