virat kohli with rohit sharma twitter
Sports

Team India News: भविष्यात हे २ खेळाडू घेणार रोहित- विराटची जागा; दिग्गज खेळाडूने सुचवले पर्याय

Virat Kohli- Rohit Sharma Replacement: भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतात.

Ankush Dhavre

विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही गेली एक दशक भारतीय संघासाठी खंबीरपणे उभे आहेत. मात्र दोघेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहेत. दोघेही येत्या १ ते २ वर्षात क्रिकेटला रामराम करु शकतात.

त्यामुळे एकच प्रश्न उपस्थित होतोय की, रोहित- विराटनंतर त्यांची जागा कोण घेणार? दरम्यान भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटसाठी पर्याय सुचवले आहेत.

भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर काही दिवसांपूर्वी विराट कोहलीला फलंदाजी प्रशिक्षण देताना दिसून आले होते. आता स्टार स्पोर्ट्सवर बोलताना ते म्हणाले की, ' ते (यशस्वी आणि शुभमन) त्याच वयोगटात आहेत, जे २०१३ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा होते. यशस्वी थोडा लहान आहे, पण अंतर खूप कमी वर्षांचं आहे. दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार सुरुवात केली आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की हे दोघेही भारतीय क्रिकेटच्या येणाऱ्या पिढीसाढी ट्रेन्डसेटर आहेत.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेपूर्वी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल भारताचं भविष्य म्हणून माझ्यासाठी तरी नंबर १ ला होते. मला तरी वाटतं की पुढे जाऊन पुढे जाऊन दोघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगेल. आता कोण जिंकणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.'

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघेही वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. मात्र दोघेही लवकरच कसोटी आणि वनडे क्रिकेटलाही रामराम करु शकतात. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलबद्दल बोलायचं झालं, तर दोघेही तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

जयस्वालच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याने १९ कसोटी सामन्यांमध्ये १७९८ धावा केल्या आहेत, तर २३ टी-२० सामन्यांमध्ये ७२३ धावा केल्या आहेत.

तर गिलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ३२ कसोटी सामन्यांमध्ये १८९३ धावा केल्या आहेत. तर ४७ वनडे सामन्यांमध्ये २३२८ आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४१५ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT