IND vs NZ saam tv
Sports

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सिरीज आता निर्णायक टप्प्यावर आलीये. पहिला सामना भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार कमबॅक केलं.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. सध्या ही वनडे सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल त्याच्या नावे ही सिरीज होणार आहे. टीम इंडियाने २०१९ पासून घरच्या मैदानावर एकही वनडे सिरीज गमावलेली नाही. दरम्यान न्यूझीलंडने भारतात कधीही वनडे सिरीज जिंकलेली नाही. त्यामुळे, दोन्ही टीम्स हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील.

भारत आणि न्यूझीलंडमधील यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर एकूण सात वनडे सामने खेळले आहेत. या सात पैकी सर्व सामने टीम इंडियाने जिंकलेत. आज शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मैदानावर आठवा वनडे सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

कसं आहे होळकरचं पीच?

इंदूरच्या होळकर स्टेडियमचं पीच फलंदाजांसाठी उत्तम मानलं जातं. ही एक सपाट पीच असून या ठिकाणी रन्स करणं सोप्पं जातं. या पीचवर नवीन बॉल सुरुवातीला थोडा स्विंग होऊ शकतो, परंतु जसजसा तो जुना होईल तशा रन्स करणं सोपं जाईल.

भारत-न्यूझीलंड सामना काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. मात्र दव पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, टॉस जिंकणारी टीम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकते.

कशी आहे भारताची संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग ११

डेवोन कॉन्वे, हेनरी निकल्स, विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (कर्णधार), जेडन लेनॉक्स, जकारी फाउल्क्स, काइल जेमिसन आणि क्रिस्टिन क्लार्क.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Mumbai Ahmedabad Expressway: गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा कारण

Glowing skin tips: व्हाईटहेड्स परत कधीच येणार नाहीत; या ६ सिक्रेट स्किन केअरचा करा वापर

Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

ZP Election : पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का, झेडपीच्या निवडणुका लागताच दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT