tpl  saam tv
Sports

TPL 2024: टेनिस प्रिमियर लीग स्पर्धेत हैदराबादची हॅट्रीक! मुंबईला नमवत तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

Tennis Premier League 2024: या स्पर्धेतील फायनलमध्ये हैदराबाद स्ट्रायकर्स आणि यश मुंबई हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

Ankush Dhavre

क्लिअर प्रिमियम वॉटर पुरस्कृत टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या मोसमात अंतिम लढतीत हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाने यश मुंबई ईगल्स संघाचा 51-44 असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद संपादन केले. हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाकडून हॅरिएट डार्ट, बेंजमिन लॉक, विष्णू वर्धन यांनी संघाच्या विजय मोलाचा वाटा उचलला.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत महिला एकेरीत हैद्राबादच्या हॅरिएट डार्टने मुंबईच्या झायनेप सोंमेझचा 14-11 असा पराभव करून संघाचे खाते उघडले.

पुरुष एकेरीत मुंबईच्या करण सिंगने हैद्राबादच्या बेंजमिन लॉकचा 14-11 असा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत हैद्राबादच्या हॅरिएट डार्टने विष्णू वर्धनच्या साथीत मुंबईच्या झायनेप सोंमेझ व जीवन नेद्दुचेझियनचा 16-9 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.

अखेरच्या चुरशीच्या पुरुष दुहेरीच्या लढतीत मुंबईच्या करण सिंग व जीवन ने द्दुचेझियन यांनी कडवी झुंज दिली. पण हैद्राबादच्या बेंजमिन लॉक व विष्णू वर्धन यांनी मुंबईच्या करण सिंग व जीवन ने द्दुचेझियन यांना 10-10 असे बरोबरीत रोखले.

याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत यश मुंबई ईगल्स संघाने गुजरात पँथर्स संघाचा 51-43 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात महिला एकेरीत मुंबईच्या झायनेप सोंमेझने गुजरातच्या एकतेरीना काझीनोव्हाचा 14-11 असा तर, पुरुष एकेरीत गुजरातच्या सुमित नागलने मुंबईच्या करण सिंगचा 14-11 असा पराभव केला.

मिश्र दुहेरीत मुंबईच्या झायनेप सोंमेझ व जीवन नेद्दुचेझियन यांनी गुजरातच्या एकतेरीना काझीनोव्हा व विजय सुंदर प्रशांत यांचा 16-9 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीत मुंबईच्या जीवन नेद्दुचेझियन व करण सिंग या जोडीने विजय सुंदर प्रशांत व सुमित नागल यांचा 10-9 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत हैद्राबाद स्ट्रायकर्स संघाने राजस्थान रेंजर्स संघाचा 51-42 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत हैद्राबादच्या हॅरिएट डार्टने क्रिस्टिना दिनूचा 14-11 असा तर राजस्थानच्या आर्थूर् फेरी याने हैद्राबादच्या बेंजमिन लॉकचा 13-12 असा पराभव केला.

मिश्र दुहेरीत हॅरिएट डार्टने विष्णू वर्धनच्या साथीत क्रिस्टिना दिनू व रोहन बोपण्णा यांचा 15-10 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत विष्णू वर्धन व बेजंमिन लॉक यांनी राजस्थानच्या रोहन बोपण्णा व आर्थुर् फेरी यांचा 10-8 असा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT