IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?

Mohammed Siraj vs Travis Head: भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड आमनेसामने आले होते.
IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?
mohammed siraj travis headtwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिसबेनच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड दोघेही आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करुन मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. दरम्यान या दोघांमध्ये झालेला वादाचा भडका आता ऊडू लागला आहे.

IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?
IND vs AUS 2nd Test: हेडचं शतक, बुमराह - सिराजचा विकेट्सचा चौकार! ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी

नेमकं काय घडलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु असताना, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना मोहम्मद सिराज ८२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. ट्रेविस हेड १४० धावांवर फलंदाजी करत होता.

त्यावेळी सिराजने त्याला क्लिन बोल्ड केलं. बाद होताच हेड काहीतरी म्हणाला, त्यानंतर सिराजनेही त्याला रागात बाहेर जाण्याचा इशारा केला. या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फॅन्सने सिराजला बुईंग केलं.

IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?
IND vs AUS: विकेट फेकली! Out नसतानाही मार्श गेला मैदानाबाहेर; अश्विनही झाला शॉक,नेमकं काय घडलं?

आयसीसी कारवाई करणार?

अॅडलेड कसोटीतील या घटनेवर आयसीसी प्रकाश टाकणार असल्याचा उल्लेख द डेली टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. आयसीसी दोघांवरही कारवाई करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र क्रिकेट एक्स्पर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या घटना क्रिकेटमध्ये होत राहतात. त्यामुळे निलंबन केलं जाणार नाही. शिक्षा मिळू शकते, पण ती फार मोठी नसेल.

या घटनेनंतर दोघांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. हेडने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, त्याने सिराजला वेल बॉल असं म्हटलं होतं. तर सिराज म्हणाला की, हेड असं काहीच म्हणाला नव्हता.

IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?
IND vs AUS : विराट-रोहितचा फ्लॉप शो, भारतावर पराभवाची नामुष्की, पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा १० विकेट्सने विजय

भारताचा पराभव

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाचा डाव १८० धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३३७ धावा करत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर भारताला दुसऱ्या डावात १७५ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १९ धावा करायच्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com