Mohammed Siraj: बघतोस काय रागानं, विकेट घेतलाय वाघानं; बाद होताच हेड भडकला, मग सिराजने..- VIDEO

Mohammed Siraj vs Travis Head: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात हेड बाद होताच मोहम्मद सिराज भडकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mohammed Siraj: बघतोस काय रागानं, विकेट घेतलाय वाघानं; बाद होताच हेड भडकला, मग सिराजने..- VIDEO
mohammed siraj twitter
Published On

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत वातावरण तापणार नाही, अंस होईल का? ट्रेविस हेडने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ३०० धावांचा पल्ला गाठला.

मात्र बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज आणि ट्रेविस हेड यांच्यात बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सुरुवात हेडने केली आणि शेवट सिराजने केला. कारण सिराज आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. हेडने त्याला डिवचलं. त्यामुळे सिराजने त्याला रागात बाहेर जाण्याचा इशारा केला.

Mohammed Siraj: बघतोस काय रागानं, विकेट घेतलाय वाघानं; बाद होताच हेड भडकला, मग सिराजने..- VIDEO
IND vs AUS: विकेट फेकली! Out नसतानाही मार्श गेला मैदानाबाहेर; अश्विनही झाला शॉक,नेमकं काय घडलं?

या सामन्यात फलंदाजी करताना, ट्रेविस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने या डावात १४१ चेंडूंचा सामना करत १७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने १४० धावांची खेळी केली. या धावा त्याने ९९.२९ च्या स्ट्राईक रेटने केल्या. मात्र मोहम्मद सिराजने त्याला बाद करत माघारी धाडलं.

तर झाले असे की, भारताने दुसरा नवा चेंडू घेतल्यानंतर मोहम्मद सिराज८२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील सुरुवातीच्या ३ चेंडूंवर सिराजने हेडला अडचणीच आणलं.

Mohammed Siraj: बघतोस काय रागानं, विकेट घेतलाय वाघानं; बाद होताच हेड भडकला, मग सिराजने..- VIDEO
IND vs AUS 2nd Test Day 1: अ‍ॅडलेटमध्ये टीम इंडिया ढेपाळली; फलंदाज अपयशी होण्याची आहेत ३ मोठी कारणं

त्यानंतर चौथा चेंडू त्याने स्विंगिंग यॉर्कर टाकला. जो मधल्या यष्टीला जाऊन धडकला. क्लिन बोल्ड होताच, हेड सिराजला काहीतरी म्हणाला, त्यानंतर सिराजने त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने १८० धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ३३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रेविस हेडने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली.

Mohammed Siraj: बघतोस काय रागानं, विकेट घेतलाय वाघानं; बाद होताच हेड भडकला, मग सिराजने..- VIDEO
IND vs AUS 2nd Test Day 1: ॲडलेड टेस्टचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, स्टार्कनंतर मॅकस्विनीची दमदार खेळी

तर मार्नस लाबुशेनने ६४ धावांची खेळी केली. तकर सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या मॅकस्विनीने ३९ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या डावात १५७ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com