Team India  x
Sports

Team India : इंग्लंडमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का! मालिका सुरु होण्याआधीच दुखापतीमुळे दोन खेळाडू संघातून बाहेर

Team India News : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला २० जून रोजी सुरुवात होईल. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी भारताचा अंडर १९ चा संघ देखील इंग्लंड दौऱ्यावरील पहिला सामना खेळेल. पण मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला दुहेरी धक्के बसल्याचे समोर आली आहे.

Yash Shirke

India Tour of England : २० जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताचा संघ इंग्लंडला भिडणार आहे. दुसऱ्या बाजूला, भारताचा अंडर-१९ संघ २४ जूनपासून इंग्लंड दौऱ्यावरील पहिला सामना खेळणार आहे. पण सामन्यापूर्वी संघाला दुहेरी धक्के बसले आहेत.

भारताच्या अंडर १९ संघातील आदित्य राणा आणि खिलन पटेल हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू दुखापतींमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी नव्या दोन खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. ज्युनियर क्रिकेट समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी आदित्य राणा आणि खिलन पटेल यांच्या जागी डी-दीपेश आणि नमन पुष्पक यांना संधी दिली आहे.

दीपेश आणि नमन हे भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या स्टँडबाय खेळाडूपैकी होते. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरु असलेल्या एका कॅम्पमध्ये आदित्य राणाच्या पाठीच्या कण्यातील स्ट्रेस फॅक्चर झाला. तर खिलन पटेलच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयने दोन नव्या खेळाडूंना संधी दिली.

२२ मे रोजी इंग्लड दौऱ्यासाठी बीसीसीआयद्वारे भारताच्या अंडर-१९ संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे कर्णधारपद आयुष म्हात्रेकडे सोपावण्यात आले आहे. २४ जून रोजी दौऱ्यातील पहिला सामना खेळला जाणार आहे.

भारतीय अंडर १९ संघ (बदलीच्या घोषणेनंतर)

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि डब्ल्यूके), हरवंश सिंग (डब्ल्यूके), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधाजित गुहा, मोहम्मद सिंह, प्रणवेंद्र सिंह, दीपेश सिंह, डी. नमन पुष्पक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

म्हाडाकडून बंपर लॉटरी! पुण्यातील प्राईम लोकेशनवर घरे मिळणार, १३ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर

Gym Workout: दररोज जिममध्ये किती वेळ व्यायाम करावा?

Manoj jarange patil protest live updates: कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता - देवेंद्र फडणवीस

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा

Skin Care: ग्लोईंग स्किनसाठी घरी तयार केलेला 'हा' फेस मास्क नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT