Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर
team india twitter
क्रीडा | T20 WC

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर

Ankush Dhavre

भारतीय संघाने बारबाडोसमध्ये इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचं मायदेशात जंगी स्वागत होणार आहे. मात्र भारतीय संघ अजूनही बारबाडोसमधून निघू शकलेला नाही. भारतीय खेळाडू मंगळवारी भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. मात्र चक्रीवादळामुळे बारबाडोसमध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे.

यापूर्वी भारतीय खेळाडू आधी दुबई मग दुबईवरून दिल्लीला येणार होते. मात्र चक्रीवादळामुळे हा प्लान फ्लॉप झाला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय केली असल्याचं माध्यमातील वृतांमध्ये म्हटलं जात आहे. मात्र खराब हवामानामुळे भारतात येण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो.

माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघातील खेळाडू मंगळवारी चार्टर्ड विमानाने भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. हे खेळाडू बुधवारी संध्याकाळी भारतात पोहोचतील असं म्हटलं जात होतं. मात्र अजूनही भारतीय खेळाडू बारबाडोसमध्येच अडकून आहेत. आता भारतीय खेळाडू भारतात केव्हा परतणार आणि पुढे काय प्लान आहे, याबाबत बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव

बारबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून रोहित, सूर्या आणि रिषभ पंत फ्लॉप ठरले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने ७६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने ४७ धावा केल्या. या खेळीच्या बळावर संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहोचवली. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावांनी माघारी राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivaji Maharaj Wagh Nakh : लंडनमधील 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? खळबळजनक खुलासा, पाहा VIDEO

Game Changer : "आता अख्खा गेमच बदलणार...", कियारा अडवाणी आणि रामचरणने 'गेम चेंजर'बद्दल चाहत्यांना दिली महत्वाची अपडेट

Dharashiv News : आश्रम शाळा शिक्षक, कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन; भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

Mumbai VIDEO: थोड्याच वेळात मुंबईमध्ये हाय टाईड, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

BCCI Prize Money: 1983,2007,2011आणि 2024, वर्ल्डकप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रुपये मिळाले होते?

SCROLL FOR NEXT