team india 
क्रीडा

IND vs BAN: सूर्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना मिळू शकते संधी! टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने २८० धावांनी विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली. तर मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सामन्यासाठी कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.

टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कमबॅक करणार आहे. तो टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसेल. मध्यक्रमात खेळण्यासाठी रियान परागला संधी दिली जाऊ शकते. रियान पराग फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. संघातील अनुभवी खेळाडू संजू सॅमसनला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात संधी दिली जाऊ शकते.

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खान, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाला संधी दिली जाऊ शकते. या तिन्ही गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. या मालिकेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर, तर मालिकेतील दुसरा सामना ९ आणि तिसरा सामना १२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

या मालिकेसाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षित राणा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whale Fish Vomit : व्हेल माशाच्या कोट्यावधी रुपयांच्या उलटीची तस्करी, पोलिसांनी सापळा रचत तिघांना ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Updates: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच मगरींची पिल्ल जप्त

Maharashtra Election : आगामी निवडणुकीत राखीव मतदारसंघ आणि महिला मतदारसंघाची संख्या किती? आयोगाने दिली महत्वाची माहिती, वाचा

Kalyan Crime : आधी सिनेस्टाईल पाठलाग, नंतर भररस्त्यात चॉपरने हल्ला; कल्याणमधील थरारक घटना CCTV त कैद

Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT