Duleep Trophy: मुशीरच्या शतकानंतर Suryakumar Yadav चाही आनंद गगनात मावेना, हटके प्रतिक्रिया देत म्हणाला..

Suryakumar Yadav On Musheer Khan: भारतीय संघातील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने मुशीर खानच्या शतकानंतर हटके प्रतिक्रिया दिली आहे.
Duleep Trophy: मुशीरच्या शतकानंतर Suryakumar Yadav चाही आनंद गगनात मावेना, हटके प्रतिक्रिया देत म्हणाला..
musheer khantwitter
Published On

देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी चारही संघ मैदानात उतरले. एका सामन्यात इंडिया ए आणि इंडिया बी तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सी आणि इंडिया डी हे संघ आमनेसामने आले आहेत.

पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान आणि रिषभ पंत सारखे खेळाडू फ्लॉप ठरले. तर दुसरीकडे युवा फलंदाज मुशिर खानने (Musheer khan) शानदार शतक झळकावलं आहे. दरम्यान मुशीर खानच्या शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) हटके कमेंट केली आहे.

मुशीर खानचं शतक होताच, सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने लिहिले की, ' काय शानदार खेळी केली मुशीर खान, नवदीप सैनीने चांगली साथ दिली. ड्युटीनंतर रोज सराव, जितकी ड्युटी तितकाच सराव.' सूर्याने एमएस धोनी द अन्टोल्ड स्टोरी चित्रपटातील डायलॉग शेअर करत मुशीर खानची फिरकी घेतली आहे. तर मुशीरचं शतक पूर्ण झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असलेला त्याचा थोरला भाऊ सरफराज खानही प्रचंड खुश झाला. त्याचा ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष करत असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.

Duleep Trophy: मुशीरच्या शतकानंतर Suryakumar Yadav चाही आनंद गगनात मावेना, हटके प्रतिक्रिया देत म्हणाला..
Duleep Trophy 2024: स्टार खेळाडूचा फ्लॉप शो सुरुच, टीम इंडियात संधी मिळणं कठीण

सूर्यकुमार यादव, मुशीर खान आणि सरफराज खान हे तिघेही मुंबई संघासाठी एकाच संघातून खेळतात. सूर्यकुमार यादवचाही दुलीप ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंडिया बी कडून यशस्वी जयस्वाल आणि अभिमन्यू ईश्वरन हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून आले. मात्र या दोघांना केवळ ३३ धावा जोडता आल्या. यशस्वी जयस्वाल ३० तर ईश्वरन १३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर विकेट्सची रांगच लागली. मुशीर फलंदाजी करत असताना, समोर रिषभ पंत, रेड्डी,वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन सारखे फलंदाज येऊन गेले.

मात्र मुशीर खेळपट्टीवर टीचून उभा राहिला. त्याने ९ व्या क्रमांकाचा फलंदाज नवदीप सैनीसोबत मिळून शतकी भागीदारी केली आहे. या शतकी भागीदारीच्या आणि वैयक्तिक शतकी खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली आहे. दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत इंडिया बी संघाने ७९ षटक अखेर २०२ धावा केल्या आहेत. मुशीर खान १०५ धावांवर तर नवदीप सैनी २९ धावांवर नाबाद आहे.

Duleep Trophy: मुशीरच्या शतकानंतर Suryakumar Yadav चाही आनंद गगनात मावेना, हटके प्रतिक्रिया देत म्हणाला..
Team India Selector: BCCI ची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या माजी विकेटकीपरला बनवलं सिलेक्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com