भारतीय संघ बऱ्याच दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आता गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पुढच्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
भारतात ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु झाल्याच्या एक आठवड्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जाणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या प्रमुख खेळाडूंना वगळलं, तर संघातील इतर खेळाडू ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना थेट भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीसाठीही ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. कारण तो बऱ्याच महिन्यांनी कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. डिसेंबर २०२२ त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला काही महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं.
अखेर आयपीएल २०२४ स्पर्धेतून त्याने कमबॅक केलं त्यानंतर भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यातही मोलाची भूमिका बजावली. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतही तो मोलाची भूमिका बजावू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.