indian cricket team twitter
Sports

Team India Playing XI: या 3 खेळाडूंना संधी मिळणं कठीण! पहिल्या सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11

IND vs BAN, Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईत रंगणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज चमकणार यात काहीच शंका नाही. खेळपट्टी पाहता रोहित शर्मा ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात यशस्वी जयस्वालसोबत मिळून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. हे दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत या जोडीने डावाची सुरुवात केली होती आणि संघाला आक्रमक सुरुवात करून दिली होती. यावेळीही या दोघांकडून चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा असणार आहे.

मध्यक्रमात विराट

या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. तो या सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसेल. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला बसावं लागेल.

सरफराज खानने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मात्र त्याला या सामन्यसाठी संधी मिळणं कठीण आहे. कारण केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

या सामन्यात रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असेल. तर कुलदीप यादव आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांना देखील संधी दिली जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा समावेश केला जाऊ शकतो.

पहिल्या कसोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT