IND vs BAN: 'आम्ही जिंकण्यासाठी काहीही..', बांगलादेशच्या कर्णधाराची टीम इंडियाला वॉर्निंग

Najmul Shanto On IND vs BAN Test Series: भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.
IND vs BAN: 'आम्ही जिंकण्यासाठी काहीही..', बांगलादेशच्या कर्णधाराची टीम इंडियाला वॉर्निंग
najmul shantotwitter
Published On

बांगलादेशचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून पराभव केला. घरच्या मैदानावर खेळताना पाकिस्तानला २- ० ने पराभवाचा सामना करावा लागला.

आता याच आत्मविश्वासासह बांगलादेशचा संघ भारतात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बांगलादेशचा संघ पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. दरम्यान भारतात येण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शांतोने पत्रकारांशी बोलताना म्हटले की,' निश्चितच, ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.

गेल्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर निश्चितच आमचा आणि आमच्या देशातील लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रत्येक मालिका ही नवी संधी असते. आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठीच मैदानात उतरु.'

IND vs BAN: 'आम्ही जिंकण्यासाठी काहीही..', बांगलादेशच्या कर्णधाराची टीम इंडियाला वॉर्निंग
IND vs BAN, T20I Series: मोठी अपडेट! बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत हा फलंदाज संघाचा भाग नसणार

भारतीय संघ सर्वोच्च स्थानी

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मात्र ही स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेशला पराभूत करावं लागणार आहे.

तर दुसरीकडे बांगलादेशला गुणतालिकेत पुढे निघायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत भारतीय संघाला पराभूत करावं लागेल. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' रँकिंगमध्ये त्यांचा संघ आमच्यापेक्षा खूप पुढे आहे. मात्र आम्ही नुकताच चांगली कामगिरी केली आहे. पाच दिवस चांगला खेळ करणं हेच आमचं लक्ष्य असणार आहे.'

IND vs BAN: 'आम्ही जिंकण्यासाठी काहीही..', बांगलादेशच्या कर्णधाराची टीम इंडियाला वॉर्निंग
IND vs BAN Test Series: केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार भारत- बांगलादेश पहिला सामना? जाणून घ्या एकाच क्लिकवर

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com