भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कसोटी मालिका झाल्यानंतर ७ ऑक्टोबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ७ ऑक्टोबरपासून टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत भारतीय संघातील फलंदाज शुभमन गिलला विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघाचं संपूर्ण फोकस सध्या कसोटी क्रिकेटवर असणार आहे. भारताला येणाऱ्या काही महिन्यात १० कसोटी सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालसोबत मिळून महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे गिल आणि कसोटी संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की,' हो, बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत शुभमन गिलला विश्रांती दिली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ७ ऑक्टोबर, दुसरा सामना १० ऑक्टोबर आणि तिसरा सामना १३ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान या मालिकेनंतर १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका पाहता शुभमन गिलला बसवणार आहे.'
रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर शुभमन गिल हा भारतीय टी-२० संघातील प्रमुख फलंदाज आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत त्याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील चारही सामने जिंकत मालिका ४-१ ने आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर फेब्रुवारी- मार्च महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कसोटी मालिकेतील प्रमुख खेळाडूंना बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.