Team India playing XI Prediction saam tv news
क्रीडा

Team India Playing XI: रोहित- विराट सलामीला, तर फिनिशर म्हणून दुबे! T-20 WC साठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा आता समाप्त झाली आहे. लवकरच क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी २० संघ लढत देताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडू २ गटात अमेरिकेला रवाना होणार होते. पहिल्या गटातील खेळाडू अमेरिकेत दाखल झाले असून, लवकरच दुसऱ्या गटातील खेळाडू देखील अमेरिकेत दाखल होणार आहेत. दरम्यान स्टार खेळाडूंची भरमार असलेल्या भारतीय संघाची प्लेइंग ११ कशी असेल? जाणून घ्या

रोहित -विराट सलामीला

अनेक दिग्गज खेळाडूंचं म्हणणं आहे की, टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात करायला हवी. विराट कोहली आयपीएलमध्येही डावाची सुरुवात करताना दिसून आला आहे. तर रोहितने देखील आयपीएलमध्ये शतक झळकावलं आहे.

मध्यक्रमात कोण?

मध्यक्रमात फलंदाजीचा भार सूर्यकुमार यादव,संजू सॅमसन यांच्यावर असू शकतो. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर, शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर आणि संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. शिवम दुबे फिनिशरची भूमिकाही पार पाडू शकतो.

अष्टपैलू खेळाडू

संघात जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडू असणं कधीही चांगलच असतं. यावेळी भारतीय संघात ३ अष्टपैलू खेळाडू आहेत जे गोलंदाजीसह फलंदाजीतही दमखम दाखवू शकतात. या खेळाडूंचं नाव आहे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

गोलंदाजी

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत गोलंदाजीची कमान हार्दिक पंड्या,मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगच्या हाती असणार आहे. तर मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उप-कप्तान), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT