IND vs AFG: पायाच्या दुखण्याने वाढवली पंड्याची डोकेदुखी; अफगाणिस्तान दौऱ्यातही 'यादव राज'?

Hardik Pandya : एका या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या अफगाणितास्तानविरुद्धात होणाऱ्या टी२० सामन्यांच्या मालिकेला मुकणार असल्याची शक्यता आहे. हार्दिक पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान फिट होईल, असा अंदाज केला जातोय.
Hardik Pandya
Hardik PandyaYandex
Published On

Hardik Pandya Rules Out Afghanistan t20 Series :

भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे हार्दिक दोन देशांच्या संघाविरुद्धात झालेल्या क्रिकेट मालिकेला मुकला होता. आता अफगाणितास्तानच्या विरुद्धात होणाऱ्या मालिकेला देखील हार्दिक पंड्या मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे त्याच्याऐवजी सूर्यकुमारला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. (Latest News)

मिळालेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तान संघाच्या विरुद्धात होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतून हार्दिक बाहेर जाऊ शकतो. यामुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा टी२० मध्ये टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करताना दिसेल. याविषयीचे वृत्त एनआयएने दिले आहे. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चार सामने खेळल्यानंतर हार्दिक पंड्याच्या पायाला दुखापत झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१९ डिसेंबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup) बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली होती. चेंडू अडवताना हार्दिक खाली पडला होता, त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो कोणताच सामना खेळू शकलेला नाहीये.

तेव्हापासून तो पुन्हा फिट होण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवने टी२० संघाचे नेतृत्व केले आहे. भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संघाचं नेतृत्त्व सूर्यकुमारने केलं होतं. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी केली होती.

Hardik Pandya
SA vs IND 1st Test: गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दिवसाअखेर टीम इंडियाची डावात वापसी; ५ विकेट गमावत आफ्रिकेच्या २५६ धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com