team india captain rohit sharma reached dharmshala in private helicopter ahead of ind vs eng 5th test  twitter
Sports

Rohit Sharma Helicopter Entry: रोहितचा स्वॅगच लय भारी! कार, बसने नाहीतर थेट खासगी हेलिकॉप्टरने धरमशालेत एन्ट्री -Video

India vs England 5th Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धरमशालेत दाखल झाला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Helicopter Entry Video:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी धरमशालेत दाखल झाला आहे. रोहित शर्माने यावेळी हटके एन्ट्री घेतली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भारत- इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याला ७ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माने हेलिकॉप्टरने एन्ट्री केली आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कमबॅकर करत मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली.

रोहितची हेलिकॉप्टरने एन्ट्री....

रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसून येत आहे. नेहमी बसमधून संघासोबत प्रवास करणारा रोहितने यावेळी हेलिकॉप्टरमधून ग्रँड एन्ट्री केली आहे. (Cricket news in marathi)

रोहितला रेकॉर्ड करण्याची संधी...

या सामन्यात रोहित शर्माला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. ४ षटकार मारताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विवियन रिचर्ड्सला मागे सोडू शकतो. विवियन रिचर्ड्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ८४ षटकार मारले आहेत. तर रोहितच्या नावे कसोटीत ८१ षटकार मारण्याची नोंद आहे.

या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के.एस. भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT