Rohit Sharma Record: धरमशालेत मोठा रेकॉर्ड हिटमॅनच्या रडारवर! या बाबतीत विवियन रिचर्ड्सला मागे सोडण्याची संधी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील तिन्ही सामने जिंकले.
india vs england 5th test rohit sharma has chance to break record of sir vivian richards of hitting most sixes in test cricket
india vs england 5th test rohit sharma has chance to break record of sir vivian richards of hitting most sixes in test cricket yandex
Published On

IND vs ENG 5th Test, Rohit Sharma Record News:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांचा थरार सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील तिन्ही सामने जिंकले. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.

मालिकेतील शेवटचा सामना येत्या ७ मार्चपासून धरमशालेत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार किंग देखील म्हटलं जातं. कसोटीतही त्याने षटकारांचा पाऊस पाडला आहे. धरमशाला कसोटीत ४ षटकार मारताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. रोहितने आतापर्यंत कसोटीच ८१ षटकार मारले आहेत. तर ४ षटकार मारुन तो विवियन रिचर्ड्स यांना मागे सोडू शकतो. विवियन रिचर्ड्स यांच्या नावे कसोटीत ८४ षटकार मारण्याची नोंद आहे.

india vs england 5th test rohit sharma has chance to break record of sir vivian richards of hitting most sixes in test cricket
IND vs ENG: तीन सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतरही पाटीदारला पाचव्या कसोटीत का संधी द्यावी? दिग्गजाने सांगितलं कारण

कोणी मारले आहेत सर्वाधिक षटकार?

कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स अव्वल स्थानी आहे. बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत १२८ षटकार मारले आहेत. तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने फलंदाजी करताना ५९४ षटकार मारले आहेत. तर वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गेलने ५५३ षटकार मारले आहेत. (Cricket news in marathi)

india vs england 5th test rohit sharma has chance to break record of sir vivian richards of hitting most sixes in test cricket
Pat Cummins: IPL आधीच SRH ने कर्णधार बदलला! या खेळाडूवर सोपवली नेतृत्वाची जबाबदारी

हे आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज...

१२८ षटकार - बेन स्टोक्स (इंग्लंड)

१०७ षटकार - ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)

१०० षटकार - अॅडम गिलक्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)

९८ षटकार - ख्रिस गेल (वेस्टइंडीज)

९७ षटकार - जॅक कॅलिस (दक्षिण अफ्रीका)

९१ षटकार- विरेंद्र सहवाग (भारत)

८८ षटकार - ब्रायन लारा (वेस्टइंडीज)

८७ षटकार- ख्रिस केन्स (न्यूझीलंड)

८७ षटकार - टीम साउदी (न्यूझीलंड)

८५ षटकार - अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)

८४ षटकार - विव रिचर्ड्स (वेस्टइंडीज)

८२ षटकार - अँड्रयू फ्लिंटॉफ (इंग्लंड)

८२ षटकार - मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)

८१ षटकार - रोहित शर्मा (भारत)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com