आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने संघात मोठा बदल केला आहे. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करणाऱ्या एडन मार्करमला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे.
तर त्याच्याऐवजी ही जबाबदारी वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सवर सोपवण्यात आली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात पॅट कमिन्सला २०.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. तो या स्पर्धेत सर्वाधिक बोली लागलेला दुसरा सर्वात महागडा खेळाडु ठरला होता.
ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सवर सलरायझर्स हैदराबादने मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी हंगामासाठी त्याला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. त्यांनी पॅट कमिन्सचा फोटो शेअर करत,'आमचा नवा कर्णधार पॅट कमिन्स..' असं कॅप्शन लिहिलं आहे.
एडन मार्करमची सुट्टी...
दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत एडन मार्करमने सनरायझर्स इस्टर्न केप संघाचं नेतृत्व करत आपल्या संघाला जेतेपद जिंकून दिलं. मात्र आयपीएल २०२३ स्पर्धेत एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळताना सनरायझर्स हैदराबाद संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. गेल्या हंगामातील सुमार कामगिरी पाहता त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणारा कमिन्स हैदराबादला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)
कमिन्स हैदराबादला चॅम्पियन बनवणार का?
पॅट कमिन्सने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवलं होतं. आता आयपीएल स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबादलाही चॅम्पियन बनवणार असा विश्वास क्रिकेट फॅन्सने व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.