आयपीएल २०२४ स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. क्रिकेटच्या कुंभमेळ्याला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईला आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघातील सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनव्हे दुखापतग्रस्त असल्याने मे पर्यंत मैदानात उतरणार नाही. गेल्या हंगामात चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात डेवोन कॉनव्हेने मोलाची भूमिका बजावली होती. गुजरातविरुद्ध झालेल्या अंतिम संनीतही त्याने महत्वपूर्ण खेळी केली होती. मात्र पुढील आठ आठवडे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागणार आहे.
नेमकं काय झालं?
नुकताच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेचा थरार पार पडला. या मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता.मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो फलंदाजीसाठी देखील येऊ शकला नव्हता. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान यामुळेच त्याला ८ आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागणार आहे. (Cricket news in marathi)
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी असा आहे चेन्नई सुपर किंग्जचा संघ :
एमएस धोनी (कॅप्टन), डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोइन अली,राज्यवर्धन हंगरगेकर, दीपक चाहर, शिवम दुबे, निशांत सिंधु, अजय मंडल, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, मथीश पथिराना.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.