विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघातील अनुभवी फलंदाजासह उत्तम कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये विजय मिळवला. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्मावर सोपवली गेली.
ज्यावेळी विराटला कर्णधारपदावरून काढण्यात आलं त्यावेळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यामुळे असं म्हटलं गेलं होतं की, विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील संबंध चांगले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता सौरव गांगुलीने, विराटला कर्णधारपदावरून का काढलं याबाबत मोठा खुलासा केला आहे.
सौरव गांगुली यांनी rev sportz ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' रोहित शर्माने वर्ल्डकप स्पर्धेत नेतृत्वाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली. त्याने भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवलं. मला तरी वाटतं की, फायनलमध्ये झालेल्या परभवापूर्वी भारतीय संघ हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. तो एक चांगला कर्णधार असून त्याने अनेकदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्याचं कौशल्य पाहून मला आश्चर्य झालं नाही. त्या त्यावेळी कर्णधार बनला होता ज्यावेळी मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. त्याला नेतृत्वाची जबाबदारी देऊन मी कुठलीही चूक केलेली नाही.' (Cricket news in marathi)
वर्ल्डकपमध्ये ठरला सुपरहिट..
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने स्पर्धेतील सलग १० सामने जिंकले होते. शेवटी फायनलमध्ये जाऊन भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत तो केवळ एक कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणूनही सुपरहिट ठरला होता. या स्पर्धेत त्याने सलामीला येत ५०० पेक्षा अधिक धावा चोपल्या होत्या.
इंग्लंडला चारली धूळ..
सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र पुढील ३ सामने जिंकत भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.