wtc saam tv
Sports

WTC Final: दक्षिण आफ्रिकेनंतर टीम इंडिया जाऊ शकते फायनलमध्ये! फक्त करावं लागेल हे एक काम

WTC Final Scenario For Team India: पाकिस्तानला नमवत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचं टेन्शन वाढलं आहे. कारण दोन्ही संघांपैकी केवळ एकाच संघाला फायनलमध्ये प्रवेश करता येणार आहे. दरम्यान भारतीय संघासाठी कसं असेल फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

मेलबर्न कसोटीतील चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी ३५० च्या पार जाऊ शकते. भारतीय संघाला जर या स्पर्धेची फायनल गाठायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हे आव्हान पूर्ण करावं लागेल.

भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी कसं आहे समीकरण?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना ड्रॉ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. जर हा सामना ड्रॉ झाला, तर पुढील सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असेल. भारतीय संघाला पुढील सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात होणारी मालिका निर्णायक ठरेल. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका जर श्रीलंकेने २-० ने जिंकली. तर भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जर दोन्ही सामने ड्रॉ झाले किंवा श्रीलंकेने ही मालिका १-० ने जिंकली, तरीदेखील भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करुन शकतो.

कोणता संघ कितव्या स्थानी?

या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी आहे. हा सं फायनलसाठी पात्र ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर भारतीय संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना फायनलमध्ये जाण्याची समान संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT