
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर- गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर, शेवटच्या फलंदाजांनी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.
आता ज्या स्थितीत सामना आहे, ते पाहता भारतीय संघाला पाचव्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावं लागेल आणि जिंकण्यासाठी ३५० धावांचं आव्हान मिळेल.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३५० धावांपेक्षा अधिक धावांचं आव्हान पूर्ण करावं लागणार आहे. मात्र हे मुळीच सोपं नसणार आहे. कारण या मालिकेतील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये भारतीय संघाचा टॉप ऑर्डर फ्लॉप ठरलाय.
मात्र हे इतकंही कठीण नसणार आहे. कारण यापूर्वीही भारतीय संघाने ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. २०२१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळताना, भारतीय संघाने ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता या सामन्यातही अशीच काहीशी स्थिती आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय टॉप ऑर्डरला चांगली सुरुवात करुन द्यावी लागेल. जर टॉप ऑर्डरने चांगली सुरुवात करुन दिली, तर मागे येणारे फलंदाज सामना जिंकवून देऊ शकतात.
भारतीय संघाने केल्या ३६९ धावा
या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक ११४ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ८२ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डीला साथ देत वॉशिंग्टन सुंदरने ५० धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा डोंगर उभारला होता. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने ७२, सॅम कॉन्टासने ६० आणि उस्मान ख्वाजाने ५७ धावांची खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.