
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. या डावात भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर भारी पडले.
मात्र शेवटी शेपटानं भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. या दिवसातील एका षटकात जसप्रीत बुमराहने नॅथन लायनला बाद केलं होतं. मात्र एका चूक झाली आणि त्याला पुन्हा जीवदान मिळालं.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला कसून गोलंदाजी केली. या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना दिसून आले. डावातील ६५ व्या षटकात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या नवव्या फलंदाजाला पॅव्हेलियनची वाट दाखवली.
तर चौथ्या दिवसाचा खेळ ८२ व्या षटकानंतर संपला. या डावात १० व्या विकेटसाठी नॅथन लायन आणि बोलॅंडने आतापर्यंत नाबाद ५५ धावांची भागीदारी केली आहे. ही भागीदारी भारतीय संघाला चांगलीच महागात पडू शकते.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर बुमराहने लायनला स्लीपमध्ये झेल बाद केलं. त्याची विकेट पडताच भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलिया ऑल आऊट झाल्याचा जोरदार जल्लोष झाला. जल्लोष सुरू असतानाच अंपायरने हात उचलत नो बॉलचा इशारा केला आणि सर्वच शॉक झाले.
या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. बुमराहने त्याला बाद केलं मात्र भारतीय संघाला नशीबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ऑल आऊट होता होता राहिला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७४ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ३६९ धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचे २२८ धावांवर ९ फलंदाज माघारी परतले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ या डावात ३३३ धावांनी आघाडीवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.