Nitish Kumar Reddy, IND vs AUS: 'मे झुकूंगा नही साला..' अर्धशतक पूर्ण करताच नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

Nitish Kumar Reddy Pushpa Style Celebration : मेलबर्नच्या मैदानावर फलंदाजी करताना, नितीश कुमार रेड्डीने शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान अर्धशतक पूर्ण करताच त्याने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं आहे.
Nitish Kumar Reddy, IND vs AUS: ' मे झुकूंगा नही साला..' अर्धशतक पूर्ण करताच नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
nitisha kumar reddytwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव फसला होता. मात्र नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या शतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात दमदार कमबॅक केलं आहे.

सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून ५ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. तर भारताकडून फलंदाजी करताना आधी यशस्वी जयस्वाल आणि त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

Nitish Kumar Reddy, IND vs AUS: ' मे झुकूंगा नही साला..' अर्धशतक पूर्ण करताच नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
Sunil Gavaskar, IND vs AUS: निव्वळ मुर्खपणा...रिषभ पंतच्या त्या कृत्यावर सुनील गावसकर भडकले

नितीश कुमार रेड्डीचं हटके सेलिब्रेशन

नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला जेव्हा जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्याने महत्वपूर्ण खेळी केली आहे. आता तिसऱ्याच कसोटीत त्याने निर्णायक वेळी अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीविरुद्ध खेळताना आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Nitish Kumar Reddy, IND vs AUS: ' मे झुकूंगा नही साला..' अर्धशतक पूर्ण करताच नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
IND vs AUS 4th Test: अवघ्या ५ मिनिटात सामना फिरला! जयस्वालची ती एक चूक टीम इंडियाला महागात पडली

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सुरु असताना, ८३ वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर त्याने कव्हर ड्राईव्हच्या दिशेने शॉट मारला आणि आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं.

अर्धशतक पूर्ण करताच, त्याने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केलं. त्याने बॅट आपल्या मानेवरुन फिरवली आणि,' मे झुकूंगा नही साला..' सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी

भारतीय संघाचा डाव अडचणीत असताना, दोघांनी मिळून आतापर्यंत १०५ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने ४७४ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघावर पुन्हा एकदा फॉलोऑनचं संकट ओढावलं होतं.

Nitish Kumar Reddy, IND vs AUS: ' मे झुकूंगा नही साला..' अर्धशतक पूर्ण करताच नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
IND vs AUS: विराटचं चुकलंच पण खेळाडूच्या तोंडावर कोण थुंकलं होतं? कोहलीला जोकर दाखवल्यावर ऑस्ट्रेलियन मीडियावर संतापले पठाण-गावस्कर

मात्र नेमकं तेव्हाच ही जोडी जमली आणि भारताने फॉलोऑन टाळला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने शानदार ८२ धावांची खेळी केली. तो धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने ३६ आणि केएल राहुलने २४ धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदर अजूनही ४० धावांवर नाबाद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com