IND vs AUS: विराटचं चुकलंच पण खेळाडूच्या तोंडावर कोण थुंकलं होतं? कोहलीला जोकर दाखवल्यावर ऑस्ट्रेलियन मीडियावर संतापले पठाण-गावस्कर

Virat Kohli Australian Media: मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवशी कोहलीने सॅमला खांदा मारला. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियन मीडिया विराटची सर्वात मोठी टीकाकार बनली.
Virat Kohli Australian Media
Virat Kohli Australian Mediasaam tv
Published On

विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांच्यामध्ये झालेला कथित वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवशी कोहलीने सॅमला खांदा मारला. यानंतर ICC ने कोहलीवर कारवाई देखील केली. मात्र यामध्ये आता ऑस्ट्रेलियन मिडीयाने उडी घेतली असून त्यांनी कोहलीचा अपमान केला आहे.

ऑस्ट्रेलिया मिडीयाकडून विराटचा अपमान

या दिवसानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया, टीमचे चाहते आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी विराट कोहलीवर टीका केली. तर बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियन मीडिया विराटची सर्वात मोठी टीकाकार बनली. त्यांनी विराटला clown kohli म्हणजेच जोकर कोहली म्हटलं आहे. जायचे. आणखी एका मीडिया हाऊसने भारतीय दिग्गज खेळाडूला क्रायबेबीचा दर्जा दिलाय.

Virat Kohli Australian Media
Video: आधी सिराजने डिवचले, मग विराटने खांदा मारला, १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानं दिलं बॅटने उत्तर, पाहा व्हिडीओ

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा युवा ओपनर सॅम कोन्स्टासला जाणीवपूर्वक धक्का दिला. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेचा वाद आता अजून चिघळताना दिसतोय. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने मॅच रेफरीसमोर आपली चूक मान्य केली आणि त्याला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला.

मात्र ऑस्ट्रेलियन मीडियाने या प्रकरणाचा अतिशयोक्ती केली आणि वृत्तपत्रात विराट कोहलीला जोकर म्हणून दाखवण्यात आलं. दरम्यान यावर आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन मीडियासमोर आपल्या खेळाडूंच्या लाजिरवाण्या कृत्यांची एक-एक करून नोंद केलीये.

Virat Kohli Australian Media
IND vs AUS: बॉक्सिंग डे टेस्टमधून शुभमन गिलला बाहेरचा रस्ता; नवख्या सॅम कॉन्स्टन्सने बुमराहच्याही आणले नाकीनऊ

बॉक्सिंग डे टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी मेलबर्नच्या मैदानावर जे काही घडलं त्यावरून दोन्ही देशांचे माजी क्रिकेटपटू आणि माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलंय. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने ऑस्ट्रेलियन ओपनरला धक्काबुक्की केल्याबद्दल विराट कोहलीला चूक ठरवलंच मात्र माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना त्यांचे खरे चेहरेही दाखवले. पठाणने एकामागून एक अशा अनेक गोष्टींची आठवण करून दिली, ज्यामुळे क्रिकेटला लाज वाटली होती.

Virat Kohli Australian Media
Team India: बॉक्सिंग डे टेस्ट सुरु असतानाच आली दुःखद बातमी; काळी पट्टी हातावर बांधून मैदानात उतरली टीम इंडिया

काय म्हणाला इरफान पठाण?

विराटला दोषी ठरवत त्याच्यावर सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना स्वतःच्या देशाच्या खेळाडूंनी यापूर्वी काय केलं होतं, हे पाहण्याचा सल्ला पठाणने दिला आहे. दुसऱ्या दिवशीच्या खेळाच्या पहिल्या सेशननंतर ब्रेकमध्ये सुनील गावस्कर यांच्याशी बोलताना इरफान पठाणने विचारलं की, कोणत्या देशाच्या खेळाडूने अंडर आर्म बॉलिंग केली? सँडपेपरसह बॉल टॅम्परिंग कोणी केलं? तुमच्या खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या नाहीत का?

Virat Kohli Australian Media
R Ashwin Net Worth: किती संपत्तीचा मालक आहे अश्विन? क्रिकेटशिवाय 'या' ठिकाणांहून होते कमाई

पठाण पुढे म्हणाला की, तुमच्या टीममधील एका खेळाडूने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या कुटुंबावर अश्लील टिप्पणी केली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूने विरोधी टीमच्या तोंडावर थुंकलं देखील होतं. अशा अनेक घटना आहेत, त्यामुळे विराट कोहलीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या खेळाडूंचाही विचार करा, असंही पठाण म्हणाला आहे.

सुनील गावस्करही संतापले

दरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या कृत्यावर सुनील गावस्कर देखील संतापले आहेत. त्याने सगळ्यांना फटकारलंय. गावस्कर म्हणाले की, ऑस्ट्रेलियन मीडिया आपल्या खेळाडूंच्या चुका कधीच पाहत नाही. जेव्हा आमचे अंपायर चुकीचे निर्णय देतात तेव्हा ते म्हणतील अंपायर चोर आहेत. त्यांच्या देशात चूक झाली तर अंपायर चूक करतात असं म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com