R Ashwin Net Worth: किती संपत्तीचा मालक आहे अश्विन? क्रिकेटशिवाय 'या' ठिकाणांहून होते कमाई

Ravichandran Ashwin Net Worth: सामना संपल्यानंतर भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Ravichandran Ashwin Net Worth
Ravichandran Ashwin Net Worthsaam tv
Published On

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा सामना गाबावर खेळवण्यात आला होता. हा सामना ड्रॉ झाला. गाबा टेस्ट अनिर्णित होताच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ही मॅच ड्रॉ होणं भारतीय संघासाठी विजयापेक्षा कमी नव्हतं. दरम्यान सामन्यानंतर चाहत्यांना एक धक्का बसला.

सामना संपल्यानंतर भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यावेळी त्याने सहकारी खेळाडू, बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार मानले.

कशी होती अश्विनची कारकिर्द?

अनिल कुंबळेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीत 287 सामने खेळले आहे. यावेळी 379 डावांमध्ये त्याने 765 विकेट घेतल्या आहे. टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. अश्विनने 106 टेस्ट सामन्यांच्या 200 डावात 537 विकेट्स घेतल्या आहेत.

Ravichandran Ashwin Net Worth
IND vs AUS: गाबा टेस्टमध्ये रोहित शर्माला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडूला दुखापत, मैदानही सोडावं लागलं

रोहित शर्मा काय म्हणाला?

अश्विनच्या निवृत्तीबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, "काही निर्णय वैयक्तिक असतात. टीम त्याच्या निर्णयाचा आदर करते."

Ravichandran Ashwin Net Worth
India vs Australia: गाबा टेस्टचा दुसरा दिवस हेड-स्मिथने गाजवला; ऑस्ट्रेलियाचं पारडं जड तर टीम इंडिया बॅकफूटवर

किती आहे अश्विनचं नेट वर्थ?

अश्विनची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. यामध्ये घर, गाड्या यांचा समावेश आहे. अश्विनकडे आलिशान घरासोबतच ऑडी आणि रोल्स रॉयल्ससारख्या अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यांच्या घराची किंमत जवळपास 9 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ताही आहे. क्रिकेटशिवाय तो जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.

Ravichandran Ashwin Net Worth
निवृत्तीनंतर रविचंद्रन अश्विनला किती मिळणार पेंशन?

अश्विनला बीसीसीआय किती देणार पेंशन?

बीसीसीआयच्या नियमांनुसार, पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी पुरुष खेळाडूने किमान 25 प्रथम श्रेणी सामने खेळले असले पाहिजे. याशिवाय एखाद्या क्रिकेटपटूने 25 ते 49 प्रथम श्रेणी सामने खेळल्यास त्याला 30 हजार रुपये पेन्शन मिळते. तर अश्विनला किती पेन्शन मिळणार हा प्रश्न आहे.

आर अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 106 सामन्यात 537 विकेट घेतल्यात. अश्विनने 106 सामने खेळले असतील तर त्याला 52500 रुपये पेन्शन मिळू शकते. दरम्यान अश्विनला किती पेन्शन मिळणार हे बीसीसीआय ठरवणार आहे.

Ravichandran Ashwin Net Worth
R Ashwin Retirement: अश्विन पर्व संपलं! गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com