R Ashwin Retirement: अश्विन पर्व संपलं! गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Ravichandran Ashwin Retirement News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीनंतर आर अश्विनने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
R Ashwin Retirement: अश्विन पर्व संपलं! गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
R ASHWINyandex
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गाबाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोलंदाजीमध्ये अश्विन यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली. अश्विन याने १०६ कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०० डावात ५३७ विकेट घेतल्या. त्याने ५ विकेट ३७ वेळा घेण्याचा विक्रम केलाय. अश्विन याने कसोटीमध्ये ९०७ षटके निर्धाव टाकली आहेत. अश्विन याने वनडेमधील ११४ डावात१५६ विकेट घेतल्या. तर टी२० मध्ये अश्विनच्या नावावर ७२ विकेट आहेत.

R Ashwin Retirement: अश्विन पर्व संपलं! गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
IND vs AUS: गाबाचा घमंड तोडण्यासाठी टीम इंडिया मैदानात! सामना जिंकण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

गोलंदाजीसोबत आर. अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विन याने कसोटीच्या १५१ डावात ३५०३ धावा केल्या आहेत. ६ शतके आणि १४ अर्धशतकासह अश्विन धावांचा डोंगर उभारला. तळाला फलंदाजी करताना अश्विन यानं भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अश्विन यानं वनडे क्रिकेटमध्ये ६३ डावात ७०७ धावा केल्या, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर टी२० मध्ये अश्विनने १८४ धावा केल्या

R Ashwin Retirement: अश्विन पर्व संपलं! गाबा कसोटी संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
IND vs AUS: गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण

काय म्हणाला अश्विन?

या सामन्यानंतर आर अश्विनने पत्रकार परिषदेत हजेरी लावली, या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला,' हा माझा आंतरराष्ट्री क्रिकेटमधील शेवटचा दिवस आहे. एक क्रिकेटपटू म्हणून माझ्यात अजूनही दमखम शिल्लक आहे. त्यामुळे मी क्लब क्रिकेट खेळणार. मात्र हा शेवटचा दिवस असे. मी माझ्या कारकिर्दीची भरपूर आनंद घेतला.

तसेच तो पुढे म्हणाला, 'मी खूप विचार केल्यानंतर क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या प्रशिक्षकांनी, सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं. त्यांचे मी आभार मानतो. मी येणाऱ्या आव्हांनाची वाट पाहतोय. मात्र कसोटी क्रिकेट नेहमीच माझ्या मनात राहिल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com