IND vs AUS: गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण

Team India WTC Scenario If IND vs AUS 3rd Test Ends With Draw: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यास कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
IND vs AUS:  गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण
team indiatwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसापर्यंत भारतीय संघावर पराभवाचं संकट होतं. मात्र चौथ्या दिवशी सामना फिरला.

भारतीय फलंदाजांनी चौथ्या दिवशी फॉलोऑन टाळला आणि भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं. दरम्यान हा सामना ड्रॉ च्या दिशेने जात आहे. जर हा सामना ड्रॉ झाला, तर कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

IND vs AUS:  गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण
IND vs AUS: गाबाचा घमंड तोडण्यासाठी टीम इंडिया मैदानात! सामना जिंकण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जर हा सामना ड्रॉ झाला, तर भारतीय संघाची विजयाची सरासरी घसरुन ५७.२९ वरुन ५५.८८ वर जाऊन पोहचेल. मात्र याचा रँकिंगवर कुठलाही फरक पडणार नाही. तर ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

IND vs AUS:  गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण
IND vs AUS: 'माझ्या बॅटिंगवर Doubt घेताय?', पत्रकाराने प्रश्न विचारला अन् बुमराहने खणखणीत षटकाराने उत्तर दिलं- VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडे विजय मिळवण्याची देखील संधी आहे. मात्र जर भारताने विजय मिळवण्यासाठी जोर न लावता, सामना ड्रॉ च्या दिशेने नेला, तरीदेखील ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे.

हा सामना जर ड्रॉ झाला, तर भारतीय संघ मेलबर्न कसोटीत १-१ च्या बरोबरीत जाईल. त्यानंतर जर भारताला कुठल्याही संघावर निर्भर न राहता फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर मालिकेतील पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. यासह भारतीय संघ ३-१ ने मालिका जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकिट मिळवू शकतो.

IND vs AUS:  गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर

हा कसोटी सामना जर ड्रॉ झाला, तर भारतीय संघाल मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. असं झाल्यास भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. जर भारताने ही मालिका २-१ ने जिंकली, तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाकडून व्हॉईटवॉशपासून वाचावं लागेल. असं झाल्यास भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

IND vs AUS:  गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण
IND VS AUS, Day 4: शेपटानं लाज राखली, कांगारुंना झोडलं! बुमराह- आकाशदीपने फॉलोऑन टाळला

जर ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली, तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल. जर भारताने ही मालिका गमावली, तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपतच्या फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीतून बाहेर होऊन जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com