
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबामध्ये खेळवला जातोय. या सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियन टीमने पहिल्या डावात सात विकेट गमावून ४०५ धावा केल्या आहेत.
दुसरा दिवसातील पहिले दोन सेशन ऑस्ट्रेलियाच्या नावे राहिले. तर तिसऱ्या सेशनमध्ये भारताने विकेट्स काढल्या. यावेळी दुसर्या दिवसाच्या अखेरीस ॲलेक्स कॅरी 45 आणि मिचेल स्टार्क 7 रन्सवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड (152) आणि स्टीव्ह स्मिथ (101) यांनी शतकी खेळी खेळली. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने खेळ केला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 ओव्हर्सचा सामना खेळला. 80 चेंडूंच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपनर्सने सुसाट फलंदाजी करत 28 रन्स केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने एकही विकेट गमावली नाही.
दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाला जसप्रीत बुमराहने ऋषभ पंतकडून कॅच आऊट केलं. त्यावेळी भारताला लवकर यश मिळालं. ख्वाजाने तीन चौकारांच्या मदतीने 21 रन्स केले आहेत. त्यानंतर बुमराहने दुसरा ओपनर नॅथन मॅकस्विनी (9 धावा) यालाही आऊट केलं.
यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 37 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र नितीश कुमार रेड्डी ही पार्टनरशिप तोडली. नितीशने मार्नस लॅबुशेनची १२ रन्सवर विकेट काढली. 75 धावांत तीन विकेट पडल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची जोडीने भारताची धुलाई केली. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 245 धावांची पार्टनरशिप झाली.
यावेळी दोन्ही फलंदाजांनी परीने शतकं झळकावली. हेडने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 9वं आणि भारताविरुद्धचे तिसरं शतक झळकावलं. हेडने ॲडलेड टेस्टमध्ये देखील शतक झळकावलं होतं. स्मिथने त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील ३३वं शतक तर भारताविरुद्ध १०वं शतक झळकावलं.
जसप्रीत बुमराहने ही भागीदारी संपुष्टात आणली. नव्या बॉलने बुमराहने स्टीव्ह स्मिथला माघारी धाडलं. स्मिथने 190 चेंडूंत 12 चौकारांसह 101 रन्सची खेळी केली. त्यानंतर बुमराहने त्याच ओव्हरमध्ये मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडला बाद केलं
गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात टेस्ट सामने खेळले गेलेत. यामध्ये टीम इंडियाने 5 सामने गमावलेत तर आणि एक सामना अनिर्णित राहिला. जानेवारी २०२१ मध्ये गाबा येथे भारतीय संघाचा एकमेव टेस्ट विजय होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्स राखून पराभव केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.