IND vs AUS: गाबा टेस्टमध्ये रोहित शर्माला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडूला दुखापत, मैदानही सोडावं लागलं

India vs Australia Test: सध्या गाबामध्ये तिसरा सामना खेळवण्यात येतोय. यावेळी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा एक महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त आहे.
India vs Australia Test
India vs Australia Testsaam tv
Published On

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच टेस्ट सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. सध्या गाबामध्ये तिसरा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीम पहिली फलंदाजी करतेय. मात्र यावेळी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा एक महत्त्वाचा गोलंदाज दुखापतग्रस्त आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्ट दुसऱ्या दिवशी भारताला मोठा धक्का बसलाय. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज जखमी झाल्याने टीमचं टेन्शन वाढलं आहे. डाव्या गुडघ्यात किंवा हॅमस्ट्रिंगमध्ये दुखू लागल्याने त्याने गोलंदाजी करणंही सोडलं. यावेळी तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या अडचणीमुळे कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे.

India vs Australia Test
Mohammed Siraj: ऑस्ट्रेलियन फॅन्सचं हे चुकलंच! सिराज मैदानात येताच बुईंग

सिराजला काय झालं?

37 व्या षटकात दोन बॉल टाकल्यानंतर सिराजने डाव्या गुडघ्यात वेदना जाणवल्या. त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या झाली. शेवटी फिजिओला मैदानात बोलावावं लागलं. काही वेळ सपोर्ट स्टाफ सदस्याशी बोलल्यानंतर सिराजने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. सिराज सलग सातवी ओव्हर टाकत होता. मात्र मध्येच त्याला वेदना जाणवू लागल्या. महत्त्वाच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचच्या काही मिनिटं आधी भारतीय वेगवान गोलंदाज मैदानात परतला.

India vs Australia Test
IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना

बांगर आणि हेडनने सांगितलं कारण

स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करणारे भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, सिराजला बाहेर होण्याचं कारण दीर्घ स्पेल असू शकतो. तर दुसरीकडे मॅथ्यू हेडनने सांगितलं की, दिवसभर सिराजचा स्पिड कमी राहिला.

India vs Australia Test
NZ vs ENG: नशीब खराब असावं पण इतकं पण नसावं; केन विलियन्सनचा विकेट पाहून डोक्यालाच हात लावाल

सिराजची गाबा टेस्टमध्ये कामगिरी

सिराजने आत्तापर्यंत गाबा टेस्टमघ्ये एकही विकेट घेतली नाहीये. मात्र त्याने प्रोबिंग लाइन्स आणि लेन्थसह गोलंदाजी केली आहे. 33व्या ओव्हरमध्ये मार्नस लॅबुशेनसोबतसोबत खेळलेला माईंडगेम कामी आला. कारण पुढच्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट गेली. नितीश रेड्डीने लॅबुशेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

India vs Australia Test
NZ vs ENG: शेवटच्या सामन्यात साऊदीने इतिहास रचला! सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत ख्रिस गेलची केली बरोबरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com