IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना
brisbanetwitter

IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना

India vs Australia 3rd Test, Day 1: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. दरम्यान या सामन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे अवघ्या १३.२ षटकांचा खेळ झाला. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला बिनबाद २८ धावा करता आल्या आहेत.

भारतीय संघाने जिंकला टॉस

भारतीय संघाने मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकला आहे. या सामन्यातही नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या दिशेने लागला. ढगाळ वातावरण असल्यामुळे रोहितने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामना सुरु झाला खरा पण, फार वेळ सुरु राहिला नाही. ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि मॅकस्विनीची जोडी मैदानात आली. या दोघांनी हवेत स्विंग होणारे चेंडू खेळून काढले.

IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना
IND vs AUS 3rd Test: ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ चाले! एकाच सेशनमध्ये दोनदा थांबवावा लागला सामना

त्यानंतर सहावे षटक सुरु असताना पावसाने हजेरी लावली. पाऊस येताच सामना थांबवावा लागला. त्यानंतर १५ ते २० मिनिटं पाऊस सुरुच होता. पाऊस थांबल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर काही षटकं सामना सुरु राहिला आणि पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली.

मग काय सामना सुरु होऊ शकला नाही. सुरुवातीचे दोन सत्र पावसामुळे धुतल्यानंतर, अखेर पावसामुळे पहिल्या दिवसाचा शेवट करण्यात आला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी ५:२० ला सुरु होईल. पहिल्या दिवसाचे वाया गेलेले षटक भरुन काढण्यासाठी हा खेळ ९८ षटकांचा असेल .

IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना
Ind vs Aus Match Timings: भारत - ऑस्ट्रेलिया सामन्याची वेळ पुन्हा बदलली! किती वाजता सुरू होणार सामना?

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, रविंद्र जडेजा, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, आकाश दीप.

IND vs AUS 3rd Test: गाबा कसोटीवर पावसानं फेरलं पाणी! दुसऱ्या दिवशी आणखी लवकर सुरु होणार सामना
Ind vs Aus Test : हा प्लान सक्सेस झाला तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी टीम इंडियाचीच!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com