NZ vs ENG: नशीब खराब असावं पण इतकं पण नसावं; केन विलियन्सनचा विकेट पाहून डोक्यालाच हात लावाल

Kane Williamson Wicket: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात केन विलियन्सन आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद झाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
NZ vs ENG: नशीब खराब असावं पण इतकं पण नसावं; केन विलियन्सनचा विकेट पाहून डोक्यालाच हात लावाल
kane wiliamsontwitter
Published On

इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना हेमिल्टनच्या सेडन पार्क क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे.

या सामन्यात फलंदाजी करताना केन विलियम्सनला चांगली सुरुवात मिळाली होती. तो अर्धशतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र इतक्यात त्याने आपल्या आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतला.

तो आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद झाला,ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

NZ vs ENG: नशीब खराब असावं पण इतकं पण नसावं; केन विलियन्सनचा विकेट पाहून डोक्यालाच हात लावाल
IND vs AUS 3rd Test: ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ चाले! एकाच सेशनमध्ये दोनदा थांबवावा लागला सामना

तर झाले असे की, न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असताना ५९ वे षटक सुरु होते. त्यावेळी इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्स गोलंदाजी करण्यासाठी आला. तर न्यूझीलंडकडून केन विलियम्सन आणि डॅरील मिशेल खेळपट्टीवर होते.

या षटकातील शेवटचा चेंडू विलियम्सनने डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू विलियम्सनन डिफेंड तर केला, पण त्याला नशिबाने त्याला साथ दिली नाही.

आपल्या सॉलिड डिफेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या विलियम्सनने चेंडू तर थांबवला, मात्र चेंडू बॅटला लागल्यानंतर खेळपट्टीला लागून उसळला आणि यष्टीच्या दिशेने जात होता. इतक्यात विलियम्सनने हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला.

पण चेंडू त्याला पायाला लागून यष्टीला जाऊन धडकला. त्यामुळे त्याला त्रिफळाचीत होऊन माघारी परतावं लागलं. ज्यावेळी तो बाद झाला, त्यावेळी तो ४४ धावांवर फलंदाजी करत होता. मात्र नशिबाने साथ न दिल्याने त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या दिवसाखेर ९ गडी बाद ३१५ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टॉम लेथमने ६३ आणि मिचेल सँटनरने नाबाद ५० धावांची खेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com