Surabhi Jayashree Jagdish
टीम इंडियाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टेस्ट सिरीजतील दुसऱ्या सामन्यात अश्विनला संधी मिळाली. यावेळी त्याला फारशी कामगिरी करता आली नाही. आता निवृत्तीनंतर अश्विनला किती पेन्शन मिळेल हे समजून घ्या.
आर अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 106 सामन्यात 537 विकेट घेतल्यात. त्याच्या नावावर 37 5 विकेट्स आहेत आणि 8 वेळा मॅचमध्ये 10 विकेट घेतल्यात. अश्विनने 156 वनडे विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने T20 मध्ये 72 विकेट घेतल्यात.
नियमांनुसार, पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी, पुरुष क्रिकेटपटूने किमान 25 प्रथम श्रेणी सामने खेळले पाहिजेत. एखाद्या क्रिकेटपटूने 25 ते 49 प्रथम श्रेणी सामने खेळल्यास त्याला 30 हजार रुपये पेन्शन मिळते.
तर 50 ते 74 सामने खेळणाऱ्यांना 45 हजार रुपये मिळतात. याशिवाय 75 किंवा त्याहून अधिक सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना 52500 रुपये मिळतात.
अश्विनने 106 सामने खेळले असतील तर त्याला 52500 रुपये पेन्शन मिळू शकते. मात्र, त्याला किती पेन्शन मिळणार हे बीसीसीआय ठरवणार आहे.
अश्विनची एकूण संपत्ती 132 कोटी रुपये आहे. अश्विन हा बीसीसीआयच्या ए ग्रेडमध्ये आहे आणि तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.