tanush kotian tanush kotian
क्रीडा

मानला रे तुला! Duleep Trophy नंतर Irani Cup मध्येही तनुष कोटियनचा जलवा

Tanush Kotian Century: मुबंईकडून खेळताना तनुष कोटियनने शानदार शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

Mumbai vs Rest Of India, Tanush Kotian: क्रिकेटमध्ये मुंबईकरांना खडूस का म्हणतात, याचं ताजं उदाहरण म्हणजे तनुष कोटियन. गोलंदाज असून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आणि रेस्ट ऑफ इंडियाच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं.

पहिल्या डावात ५०० धावांचा पल्ला गाठणाऱ्या मुंबईचा डाव दुसऱ्या डावात गडगडला. संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतला. सर्वांना वाटलं होतं की, इथून सामना फिरणार. मात्र तनुष कोटियन अवस्थीसोबत मिळून खेळपट्टीवर टिकून राहिला आणि मुंबईला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

या सामन्यातील दुसऱ्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईचा संघ मोठी आघाडी घेऊन मैदानात उतरला. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ ने ७६ धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने १४ धावा केल्या.

त्यानंतर हार्दिक तोमोरे ७, अजिंक्य रहाणे ९,श्रेयस अय्यर ८,सरफराज खान १७ धावांवर माघारी परतला. १७१ धावांवर मुंबईचे ८ फलंदाज बाद झाले होते. इथून मुंबईचा डाव पूर्ण गडगडला. मात्र त्यानंतर तनुष कोटियनने अवस्थीसोबत मिळून मोर्चा सांभाळला. दोघांनी मिळून इराणी कप स्पर्धेत ९ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला. १३५ धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्ड मोडला गेला.

तनुष कोटियनचं शतक

तनुष कोटियन हा आर अश्विन स्टाईल गोलंदाजी आणि हार्दिक पंड्या स्टाईल फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वीही रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा संघ अडचणीत असताना, त्याने फलंदाजीत शानदार कामगिरी केली.

यावेळीही मुंबईला अशा एका खेळीची गरज होती, जी संघाला मजबूत स्थितीत पोहचवू शकेल. त्याने अवस्थीसोबत मिळून डाव सांभाळला, संघाला ३०० धावांचा पल्ला गाठून दिला आणि आपलं वैयक्तिक शतकही पूर्ण केलं. या खेळीच्या बळावर मुंबईचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे.

इराणी कपपमध्ये ९ व्या विकेटसाठी मोठी भागीदारी

तनुष कोटियन - अवस्थी- १३६*

रवी शास्त्री - कुलकर्णी - १३५

सुनील गावसकर - बिशन सिंग बेदी- १०९

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT