suzie bates twitter
क्रीडा

Suzie Bates ची भन्नाट स्टोरी! बास्केटबॉलपटूने न्यूझीलंडला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिलं

Ankush Dhavre

ICC Womens T20 World Cup 2024: क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटतं की, त्याने एक दिवस देशासाठी क्रिकेट खेळावं. देशाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर देशाला वर्ल्डकप जिंकून द्यावं. तर इतर खेळ खेळणारे खेळाडू, ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची स्वप्न पाहतात. मात्र ही दोन्ही स्वप्नं एकाच खेळाडूने पूर्ण केली आहेत. ही खेळाडू आहे,न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू सूजी बेट्स.

सूजी बेट्सला तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडताना पाहीलं असेल. मात्र तिच्या नावे ऑलिम्पिक स्पर्धेत बास्केटबॉल खेळण्याची आणि न्यूझीलंडसाठी १३ वर्ल्डकप खेळण्याची नोंद आहे. अशी ऑलराऊंड कामगिरी करणारी ती जगातील एकमेव खेळाडू आहे. १२ वर्ल्डकप खेळल्यानंतर १३ व्या वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. हा विजय मिळवून देण्यात सूजी बेट्सने मोलाची भूमिका बजावली आहे.

महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा

सूजी बेट्स हिच्या नावे आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याची नोंद आहे. तिने या स्पर्धेत ११०० हून अधिक धावा केल्या आहेत. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सूजी बेट्सने १५० धावा केल्या. टी-२० वर्ल्डकपसह तिला वनडे वर्ल्डकप खेळण्याचाही चांगलाच अनुभव आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व

सूजी बेट्स क्रिकेटसह बास्केटबॉलही उत्तम खेळते. मुख्य बाब म्हणजे तिने २००६ मध्ये न्यूझीलंड संघासाठी आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात केली आणि २००७ मध्ये टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र तरीदेखील तिने बास्केटबॉक खेळणं सोडलं नव्हतं. क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करत असताना, ती २००८ मध्ये झालेल्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी मैदानात उतरली होती.

न्यूझीलंड संघाकडून खेळण्यासह तिच्याकडे प्रो बास्केटबॉल लीग खेळण्याचाही अनुभव आहे. २००७-०८ हंगामात ती क्राइस्टचर्च सीरेंस संघाकडून खेळायची. त्यानंतर २००९ मध्ये तिला ओटॅगो गोल्ड रश आणि २०१० मध्ये तिला लोगान थंडर संघासाठी खेळण्याची संधी मिळाली.

बास्केटबॉलनंतर आता क्रिकेटमध्ये तिचा जलवा पाहायला मिळत आहे. गेल्या १०टी-२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. अखेर भारतीय संघाला पराभूत करत न्यूझीलंडने पराभवाची मालिका खंडीत केली आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करते जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada PoliticsPolitics: जरांगेंविरोधात भाजपची मराठा खेळी? जाणून घ्या मराठवाड्यासाठी BJP चा स्पेशल फॉर्म्युला

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; कोण आहेत नवीन चेहरे? वाचा

Dombivli News : राज ठाकरेंविषयी अपशब्द वापरले; मनसे कार्यकर्त्यांनी दिला रिक्षा चालकाला चोप,VIDEO

Cyclone Dana: 'दाना' चक्रीवादळ या राज्यांमध्ये धडकणार, 120 किमी वेगाने वाहणार वारे; कुठे आदळणार? वाचा

Beed Politics : पंकजा मुंडेंचा समर्थक जरांगेच्या गोटात; राजेंद्र म्हस्के बीडमधून निवडणूक लढणार? VIDEO

SCROLL FOR NEXT