IND vs NZ: रोहितच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड! जे विराट, धोनीच्या नेतृत्वात नाही घडलं, ते हिटमॅनच्या नेतृत्वात घडलं

Rohit Sharma Record News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गमावताच रोहित शर्माच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
IND vs NZ: रोहितच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड! जे विराट, धोनीच्या नेतृत्वात नाही घडलं, ते हिटमॅनच्या नेतृत्वात घडलं
rohit sharma yandex
Published On

Rohit Sharma Record, India vs New Zealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

न्यूझीलंड संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. ३६ वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतात कसोटी क्रिकेट खेळताना भारतीय संघाला पराभूत केलं आहे. यापूर्वी जॉन राईट यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान कर्णधार रोहित शर्माच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

विराट कोहलीला कसोटी कर्णधारपदावरुन काढल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली होती. रोहित २०२२ पासून भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याने १९ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.

यादरम्यान भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारतात त्याने १४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

IND vs NZ: रोहितच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड! जे विराट, धोनीच्या नेतृत्वात नाही घडलं, ते हिटमॅनच्या नेतृत्वात घडलं
IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! स्टार खेळाडू संघात परतला

रोहितचा एकूण रेकॉर्ड खूप चांगला आहे. मात्र भारतात कसोटी संघाचं नेतृत्व करताना, विराट रोहितपेक्षा पुढे आहे. विराटने ३१ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. यादरम्यान भारतीय संघाला २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

विराटने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने केवळ ३ सामने गमावले होते. धोनीने ६ सामन्यांमध्ये ३ सामने गमावले होते. तर रोहितने २ वर्षांत ३ सामने गमावले आहेत.

IND vs NZ: रोहितच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड! जे विराट, धोनीच्या नेतृत्वात नाही घडलं, ते हिटमॅनच्या नेतृत्वात घडलं
Ind vs NZ Test : बंगळूरूमध्ये न्यूझीलंडच किंग; तब्बल 36 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर किवींचा विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितचा प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकला, हे त्याने मान्यही केलं. प्रथम फलंदाजीला आल्यानंतर भारतीय संघाचा डाव ४६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४०२ धावा करत १०६ धावांची आघाडी घेतली. दरम्यान न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करत सामना ८ गडी राखून खिशात घातला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com