Ind vs NZ Test : बंगळूरूमध्ये न्यूझीलंडच किंग; तब्बल 36 वर्षांनंतर भारताच्या भूमीवर किवींचा विजय

Ind vs NZ Test : बंगळूरूमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला आहे. या सामन्यात ८ विकेट्सने भारताचा पराभव झाला आहे.
Ind vs nz test
Ind vs nz testsaam tv
Published On

बंगळूरूमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. न्यूझीलंडच्या टीमने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडच्या टीमने ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. मुख्य म्हणजे न्यूझीलंडने टेस्टमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात विजय मिळवला आहे.

३६ वर्षांनंतर न्यूझीलंडचा भारतात विजय

न्यूझीलंडच्या टीमने यापूर्वी १९८८ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टेस्टमध्ये अखेरच्या वेळी १३६ रन्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा हा विजय न्यूझीलंडसाठी खास ठरला आहे. एकूणच, न्यूझीलंडचा हा भारतीय भूमीवरील तिसरा टेस्ट विजय ठरला. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील न्यूझीलंडने झेप घेतली आहे.

Ind vs nz test
Rohit sharma: बंगळूरू टेस्टमध्ये अचानक गोंधळ; सामना संपल्यानंतर अंपायरशी का भिडला रोहित शर्मा?

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 रन्सवर ऑलआऊट झाला होता. यानंतर न्यूझीलंडने 402 धावा केल्या आणि पहिल्या डावात 356 धावांची आघाडी घेतली. असं असूनही टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात उत्तम पद्धतीने कमबॅक केलं. दुसऱ्या डावात टीम इंडियाने ४६२ रन्स करत १०६ रन्सची आघाडी घेतली होती. मात्र न्यूझीलंडच्या टीमने २ विकेट्स गमावून पहिला टेस्ट सामना आपल्या नावे केला.

१०७ रॅन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. किंवींनी पहिल्याच ओव्हरमध्ये कर्णधार टॉम लॅथमची विकेट गमावली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बॉलवर लॅथम एलबीडब्ल्यू आऊट झाला. यावेळी किवी कर्णधाराला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर बुमराहने दुसरा ओपनर डेव्हन कॉन्वेलाही एलबीडब्ल्यू आऊट केलं.

कॉन्वे बाद झाला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोर 35/2 असा होता. त्यानंतर रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी किवींची विकेट जाऊ दिली नाही. रचिन रवींद्र 39 आणि विल यंग 48 रन्सवर नाबाद राहिले. अखेरीस ८ विकेट्सने या दोघांनी टीमला विजय मिळवून दिला.

Ind vs nz test
Virat Kohli Dismissal: शेवटच्या बॉलवर विराटची विकेट जाताच हळहळला रोहित शर्मा, हिटमॅनची रिएक्शन होतेय व्हायरल

न्यूझीलंडचा भारत दौरा

  • 16 ऑक्टोबर: पहिली टेस्ट, बेंगळुरू ( न्यूझीलंडचा विजय )

  • 24 ऑक्टोबर: दुसरी टेस्ट, पुणे

  • 1 नोव्हेंबर: तिसरी टेस्ट, मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com