Rohit sharma: बंगळूरू टेस्टमध्ये अचानक गोंधळ; सामना संपल्यानंतर अंपायरशी का भिडला रोहित शर्मा?

Rohit sharma: न्यूझीलंडच्या टीमला जिंकण्यासाठी १०७ रन्सची आवश्यकता आहे. दरम्यान सामन्यात चौथ्या दिवसाच्या शेवटी काहीसा अंपायर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसून आलं.
Rohit sharma
Rohit sharmasaam tv
Published On

बंगळूरूमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना खेळवण्यात येतोय. आज या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस असून या सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंडच्या टीमला जिंकण्यासाठी १०७ रन्सची आवश्यकता आहे. दरम्यान सामन्यात चौथ्या दिवसाच्या शेवटी काहीसा अंपायर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसून आलं.

चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये भारताचा डाव ४६२ रन्सवर संपुष्टात आला. त्यावेळी न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली. परंतु अवघ्या चार बॉल्सनंतर खेळ थांबवण्यात आला. जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी पहिली ओव्हर टाकाली. बुमराहने फक्त चार बॉल्स टाकले जेव्हा अंपायरने खराब प्रकाशाच्या कारणाने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अजिबात खूश नव्हता.

Rohit sharma
Virat Kohli Dismissal: शेवटच्या बॉलवर विराटची विकेट जाताच हळहळला रोहित शर्मा, हिटमॅनची रिएक्शन होतेय व्हायरल

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी अजून २० मिनिटं शिल्लक होती.

भारतीय खेळाडूंचा असा विश्वास होता की गेममध्ये किमान 20 मिनिटे शिल्लक आहेत आणि फ्लड लाइट्स देखील चालू होते. अशा स्थितीत फलंदाजाला कोणतीही अडचण येऊ नये, असं टीम इंडियाच्या खेळाडूंचं मत होतं. मात्र अंपायरने खेळ थांबवण्याचा निर्णय घेताच न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे पव्हेलियनमध्ये परतले.

रोहित-विराट थेट अंपयारशी भिडले

दरम्यान अंपायरने घेतलेल्या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली नाखूश दिसले. यावेळी उर्वरित वेळेत खेळ पूर्ण व्हावा, अशी दोघांची इच्छा होती. परंतु, या दोन्ही खेळाडूंनी घातलेल्या वादाता काहीही उपयोग झाला नाही. खेळ पुन्हा सुरू झाला असता, पण हवामान पुन्हा खराब झालं. अंपायरशी वाद घालत असताना आकाशात काळे ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाल्यामुळे कव्हर आणण्यात आले. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू देखील ड्रेसिंग रूममध्ये गेले.

Rohit sharma
Sarfaraz Khan: पंत रनआऊट होणारच होता, अचानक सरफराज जोरजोरात उड्या मारू लागला, मैदानात काय घडलं? Viral Video

टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार

सरफराज खान (150) आणि ऋषभ पंत (99) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 177 रॅन्सच्या पार्टनरशिपमुळे भारताने चांगला स्कोर केला. यावेळी ३ सामन्यांच्या सिरीजमधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. परंतु न्यूझीलंडने 54 रन्सनमध्ये सात विकेट्स घेत उत्तम कमबॅक केलंय. त्यामुळे टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com