surykumar yadav twitter
Sports

IND vs SA: इथेच सामना फिरला! सूर्याची अविश्वसनीय कॅच ठरली टीम इंडियासाठी टर्निंग पॉईंट; पाहा VIDEO

Suryakumar Yadav Catch Video: दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात दमदार कमबॅक केलं होतं. मात्र सूर्यकुमार यादवने अविश्वसनीय झेल टिपला आणि सामना भारतीय संघाच्या बाजूने फिरवला.

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विजय मिळवला आहे. यासह २००७ नंतर दुसऱ्यांदा आयसीसी टी -२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान सूर्यकुमार यादवने पडकलेली कॅच भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. १८ व्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजयाची संधी होती. कारण डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. मात्र त्यावेळीच असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता.

सूर्यकुमार यादवने टिपला वर्ल्डकप इतिहासातील सर्वोत्तम झेल

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच चेंडू हार्दिकने फुल टॉस टाकला. ज्यावर डेव्हिड मिलरने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. मात्र त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमार यादवने उडी मारत झेल टिपला. त्याने सीमारेषेच्या बाहेर जात असलेला चेंडू आत फेकला आणि हा झेल टिपला.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहचवली. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT