virat kohli and novak djokovic saam tv news
Sports

Virat Kohli- Novak Djokovic: विराटकडून नोवाक जोकोविचचं तोंडभरुन कौतुक! टेनिसच्या दिग्गजानेही दिला हटके रिप्लाय

Virat Kohli Praised Novak Djokovic: टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू नोवाक जोकोविच विराट कोहलीचे आभार मानताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli On Novak Djokovic:

लवकरच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच स्टीव्ह स्मिथसोबत टेनिसच्या कोटवर क्रिकेट खेळताना दिसून आला. क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतल्यानंतर त्याला क्रिकेटबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यात विराट कोहलीच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान जोकोविच विराटचे आभार मानताना दिसून आला आहे.

नोवाक जोकोविचने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने भारतीय क्रिकेट संघाची एक रिल शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली जोकोविचचं कौतुक करताना दिसून येत आहे.

सध्या भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. या सामन्याच्या एक दिवसापूर्वी विराट कोहलीने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नोवाक जोकोविचबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की,'मी त्याला मेसेज करण्यासाठी जेव्हा इन्बॉक्स ओपन केला तेव्हा मला दिसलं की त्याने मला आधीच मेसेज केला आहे. आधी मला वाटलं की, हा मेसेज फेक अकाऊंटवरुन आला असावा मात्र जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला दिसलं की ते फेक अकाऊंट नव्हतं. त्यानंतर आमची चर्चा सुरु झाली. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या.' (Latest sports updates)

विराट नोवाक जोकोविचचं कौतुक करताना म्हणाला की,'मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याची टेनिस कारकिर्द शानदार राहिलं आहे. मला भारतात कॉफी पित असताना त्याच्यासोबत चर्चा करायची आहे.'विराटने कौतुक केल्यानंतर नोवाक जोकोविचने त्याचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

Maharashtra Live News Update : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव वर्ष साजरा करण्यात येणार

हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार! नॉन व्हेज बिर्याणी दिल्यामुळे तरुणाची सटकली, रेस्टॉरंट मालकावर गोळी झाडली अन्...

दिवाळीसाठी घरी निघालेल्या मित्रांना वाहनानं चिरडलं! दोघांचा जागीच मृत्यू, तिसऱ्याची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics: राजकारणात मोठा ट्विस्ट! मनसेच्या कार्यक्रमाला शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी, सूचक विधान करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT