Team India Come Home:  भारतात येण्यासाठी टीम इंडियाचं विमान निघालं! किती वाजता पोहोचणार? कसं असेल नियोजन? VIDEO
team india twitter
क्रीडा | T20 WC

Team India Come Home: भारतात येण्यासाठी टीम इंडियाचं विमान निघालं! किती वाजता पोहोचणार? कसं असेल नियोजन? VIDEO

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला लोळवलं आणि १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. गेल्या ११ वर्षांपासून भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करुन दाखवलं आणि इतिहास घडवला. दरम्यान भारतीय खेळाडू बारबाडोसहून भारतात येण्यासाठी निघाले आहेत.

भारतीय संघातील खेळाडू १ जूलैला भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. मात्र चक्रीवादळामुळे सर्वकाही बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आता बारबाडोसमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदस्य,खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य आणि भारतीय क्रीडा पत्रकार एअर इंडियाच्या विमानात चढताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ Cricjhones या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडू सुखरुप भारतात यावे म्हणून स्पेशल चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. तब्बल १७ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी भारतात येत आहे. ही कोट्यावधी क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बाब आहे.

स्थानिक वेळेनुसार एअर इंडियाचं हे विमान सकाळी ४:३० वाजता बारबाडोसहून दिल्लीला जाण्यासाठी रवाना झालं आहे. हे विमान भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता भारतात दाखल होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, दिल्लीला पोहचल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ ४ जुलै रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर ४ जुलै रोजी मुंबईत वर्ल्डकपच्या ट्रॉफीसह ओपन बस रॅली काढली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही रॅली संध्याकाळी ४ वाजता नरीमन पॉईंटपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत असणार आहे.

भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान यापूर्वी २००७ मध्ये झालेल्या सामन्यातही भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत पहिल्याच हंगामात टी-२० वर्ल्डकप जिंकला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Eyes: नजर चांगली ठेवण्यासाठी 'या' ५ गोष्टींनी डोळे ठेवा निरोगी

Guru Gochar: 12 वर्षांनंतर रोहिणी नक्षत्रात गुरू, या 3 राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Weight Gain Tips: वजन वाढवायचंय? 'या' गोष्टी करुन 30 दिवसात व्हा 'वजनदार' माणूस

SCROLL FOR NEXT