Team India Celebration: टीम इंडियाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? BCCI ने शेअर केला VIDEO
indian cricket teamtwitter

Team India Celebration: टीम इंडियाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? BCCI ने शेअर केला VIDEO

ICC T20 World Cup 2024: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. बारबाडोसमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी १७७ धावांचा यशस्वी बचाव केला आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्याना या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भारताच्या विजयानंतर संघातील खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये विजयाचा जल्लोष करताना दिसून येत आहेत. भारतीय संघातील खेळाडूंनी सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसह फोटो क्लिक केले. यासह खेळाडूंचं कौतुक झालं. हा राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. त्यामुळे खेळाडूंनी त्यांमा फेअरवेल दिला. विराट कोहली आणि संघातील खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं. या ४८ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत भारतीय संघाचं ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं हे दाखवण्यात आलं आहे.

Team India Celebration: टीम इंडियाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? BCCI ने शेअर केला VIDEO
IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. मात्र त्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सांभाळला. त्याने अक्षर पटेलसोबत मिळून ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर १७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरने पूर्ण जोर लावला. मात्र शेवटी भारतीय संघाने ७ धावांनी बाजी मारली.

Team India Celebration: टीम इंडियाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? BCCI ने शेअर केला VIDEO
Team India: टीम इंडिया भारतात केव्हा येणार? परतल्यानंतर कसं असेल नियोजन? जाणून घ्या

एकीकडे भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष सुरु होता. तर दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी भारतीय संघाला मोठा धक्का दिला. या तिघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हे तिघेही वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये खेळताना दिसून येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com